नजर हटी दुर्घटना घटी! एकाच कुटुंबातील ६ जण ठार; अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:05 PM2023-09-06T12:05:19+5:302023-09-06T12:05:38+5:30

बुधवारची सकाळ उजाडली अन् तामिळनाडूतील जनतेच्या कानावर हृदय पेलावून टाकणारी बातमी पडली.

Six members of a family killed after a minivan crashed into a truck on Salem-Coimbatore National Highway in Tamil Nadu, know here  | नजर हटी दुर्घटना घटी! एकाच कुटुंबातील ६ जण ठार; अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य

नजर हटी दुर्घटना घटी! एकाच कुटुंबातील ६ जण ठार; अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य

googlenewsNext

Tamilnadu Accident Video : बुधवारची सकाळ उजाडली अन् तामिळनाडूतील जनतेच्या कानावर हृदय हेलावून टाकणारी बातमी पडली. तामिळनाडूतील सेलम येथे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सेलम-इरोड महामार्गावर पहाटे चार वाजता एका वेगवान व्हॅनने थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. खरं तर सालेम-कोची राष्ट्रीय महामार्गावरील सांक्रीजवळ चिन्नागुंडनूर येथे ओमनी व्हॅन मागून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य सर्वत्र व्हायरल होत आहे. 

दरम्यान, एंगूर येथील आठ सदस्य एका व्हॅनमधून पेरुनथुराईकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातात जीव गमावलेल्यांची नावे समोर आली असून सेल्वराज, मंजुला, अरुमुगम, पलानीसामी, पप्पाथी आणि एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात एका वर्षाच्या मुलीसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटली असून कावुंदपाडी येथील ४८ वर्षीय सेल्वराज, सेलममधील कोंडलामपट्टी येथील एक वर्षाची संजना आणि पेरुंडुराई येथील कुट्टापलायम इंगुर येथील अन्य चार जण या अपघातात दगावले आहेत. सुदैवाने अपघातातील व्हॅनच्या चालकासह तीन जण बचावले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सेलम येथील मोहन कुमारमंगलम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, सर्व मृतदेह सांक्री येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Web Title: Six members of a family killed after a minivan crashed into a truck on Salem-Coimbatore National Highway in Tamil Nadu, know here 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.