आसाममध्ये सहा दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

By admin | Published: September 24, 2016 05:49 AM2016-09-24T05:49:22+5:302016-09-24T05:49:22+5:30

शुक्रवारी सकाळी लष्कर आणि करबी पीपल्स लिबरेशन टायगर्सच्या (केपीएलटी) दहशताद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.

Six militants attacked in Assam | आसाममध्ये सहा दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

आसाममध्ये सहा दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

Next


दीफू : आसामच्या करबी अँगलाँग जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी लष्कर आणि करबी पीपल्स लिबरेशन टायगर्सच्या (केपीएलटी) दहशताद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कराने केपीएलटीच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केपीएलटीचे दोन म्हारकेही या चकमकीत मारले गेले असून, चकमकीमध्ये लष्कराचा एक जवानही जखमी झाला आहे.
सुरक्षा दलांना मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर बानीपठारच्या जंगलात लष्कराने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास कारवाई सुरू केली. लष्कर आणि पोलीस आपणास पकडण्यास आल्याचे लक्षात येताच, केपीएलटीच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला.
त्यानंतर भारतीय जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यातसहा दहशतवादी ठार झाले. ठर झालेल्या दहशतवाद्यांमध्ये केएलपीटीचे दोन म्हारके असल्याचे सांगण्यात आले. उरलेल्या चौघा मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमी जवानाला रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी त्या ठिकाणहून एक एसएलआर रायफल, इनसास (इंडियन स्मॉल आर्म सिस्टिम) रायफल, तीन पिस्तुले आणि दोन ग्रेनेड ताब्यात घेतले आहेत. केएलएनएफने (करबी नॅशनल लिबरेशन फ्रंट) शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर त्यातून फुटून २0१0-११ मध्ये केएलपीटी या नव्या दहशतवादी गटाची स्थापना झाली होती. (वृत्तसंस्था)
>अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटके असल्याचे आढळले
आसाममधील करबी जिल्हा वेगळा करून, त्याला स्वायत्त राज्य म्हणून मान्यता द्यावी, अशी या संघटनेची मागणी आहे. अरुणाचल प्रदशच्या काही भागांतही या संघटनेचे वर्चस्व असून, या संघटनेकडे सर्व प्रकारची एके४७, एके५६, एम२0 गन्स यासारखी अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटके असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे.

Web Title: Six militants attacked in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.