‘छह माह पार, यू टर्न सरकार’

By admin | Published: November 30, 2014 02:12 AM2014-11-30T02:12:47+5:302014-11-30T02:12:47+5:30

मोदी सरकारविरुद्ध शड्ड ठोकलेल्या काँग्रेसने आता संसदेत आणि संसदेबाहेर ‘यू टर्न’ मोहीम छेडण्याचा निर्णय घेतला आह़े

'Six Months Cross, You Turn Government' | ‘छह माह पार, यू टर्न सरकार’

‘छह माह पार, यू टर्न सरकार’

Next
सोशल मीडियाचा आधार : मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसची नवी घोषणा
शीलेश शर्मा ल्ल नवी दिल्ली
मोदी सरकारविरुद्ध शड्ड ठोकलेल्या काँग्रेसने आता संसदेत आणि संसदेबाहेर ‘यू टर्न’ मोहीम छेडण्याचा निर्णय घेतला आह़े याअंतर्गत सोशल मीडिया, संसद आणि जनतेत जाऊन काँग्रेस ‘छह माह पार, यू टर्न       सरकार’ अशी घोषणा देताना दिसणार आह़े
पक्ष सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक काळातील नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या अन्य बडय़ा नेत्यांची भाषणो आणि भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने याचा आढावा काँग्रेस घेत आह़े 
सत्तेवर आल्यानंतरच्या गत सहा महिन्यांत मोदी सरकारने यापैकी कोणत्या आश्वासनांची पूर्ती केली वा त्यादिशेने काय काम केले, हे शोधण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत़ विरोधी बाकांवर असताना भाजपाने अनेक मुद्यांवर काँग्रेसप्रणित तत्कालीन संपुआ सरकारला विरोध केला                होता. मात्र आज सत्तेवर येताच                  हेच भाजपा नेते याच मुद्यांचे समर्थन करीत आहे. हा विरोधाभास  जनतेसमोर आणण्याचेही कॉंग्रेसने ठरवले आह़े 
 
संपुआ सरकार-मोदी सरकारमधील फरक दाखविणार
च्काळा पैसा, सीएनजी, भारत-चीन सीमावाद, भारत-पाक संबंध, महागाई अशा मुद्यांवर मोदी सरकारला घेरण्याची काँग्रेसची योजना आह़े पक्षाचे हे डावपेच अमलात आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी अजय माकन, आनंद शर्मा, पी़ चिदंबरम, सलमान खुर्शीद यांच्यासह अनेक दिग्गज पक्ष नेत्यांना कामाला लावले आह़े 
 
च्मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार आणि मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार यांच्यातील नेमका फरक हे नेते लोकांपुढे आणणार आहेत़

 

Web Title: 'Six Months Cross, You Turn Government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.