तीन दिवसांत सहा हत्या, संपवलं संपुर्ण कुटुंब
By admin | Published: May 23, 2017 09:22 AM2017-05-23T09:22:32+5:302017-05-23T09:22:32+5:30
बीएसपी नेता चौधरी मुनव्वर हसन यांच्यासहित त्यांच्या कुटुंबातील सहा जणांची निर्घुणपणे हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चार जणांना अटक केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - बीएसपी नेता चौधरी मुनव्वर हसन यांच्यासहित त्यांच्या कुटुंबातील सहा जणांची निर्घुणपणे हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चार जणांना अटक केलं आहे. मुनव्वर यांचा सर्वात खास मित्र शाहिद उर्फ बंटी या हत्याकांडाचा मास्टरमाइंड होता. पोलिसांना चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मुनव्वर आणि त्याच्या कुटुंबियांची हत्या करुन तुकडे केल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. तीन दिवसांत सहा हत्या करत त्याने एक कुटुंबच संपवून टाकलं आहे.
भूमाफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या मुनव्वरसोबत बंडी प्रॉपर्टीच्या धंद्यात पार्टनर होता. शाहिद खान उर्फ बंटी याने पुर्णपणे प्लानिंग करत एकामागोमाग एक हत्या केल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बंटीव्यतिरिक्त त्याचा मित्र दिपक आणि सुपारी किलर फिरोज आणि जुल्फीकार यांचाही समावेश आहे. इतर दोन आरोपींचा शोध पोलीस करत आहेत.
शाहिद खान उर्फ बंटी याने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने सर्वात आधी मुनव्वर यांची पत्नी आणि दोन मोठ्या मुलींची हत्या करुन मेरठच्या दौराला गावाजवळ मृतदेह नष्ट केले. यानंतर मुनव्वर यांच्या दोन छोट्या मुलांची गळा दाबून हत्या करत बुराडी येथील संतनगरमधील एका जुन्या बंगल्यात खड्डा खोदून जमिनीखाली मृतदेह पुरण्यात आले.
20 लाखांची रक्कम आणि संपुर्ण संपत्ती हडपण्याचा डाव आखत हा हत्याकांड घडवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याशिवाय वैयक्तित वादही असण्याची शक्यता आहे. पोलीस अद्याप तपास करत आहे.
पोलीस तपासात बंटीने सांगितलं की, मुनव्वरने त्याच्याकडून 20 लाख रुपये घेतले होते. वारंवार मागणी करुनही पैसे परत करत नव्हता. याशिवाय मुनव्वरने एका फ्लॅटवर कब्जा केला होता. पैसे मागितल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी वारंवार मुनव्वर देत असल्याने बंटीला प्रचंड चीड आली होती. याचवर्षी 19 जानेवारी रोजी एका बलात्कार प्रकरणात मुनव्वरला अटक झाल्यानंतर कुटंबाची देखरेख करणा-या बंटीने हत्येचा हा कट रचला.