छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 05:22 PM2017-11-07T17:22:47+5:302017-11-07T19:20:40+5:30
नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रासलेल्या छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर भागातील अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा नक्षलवाद्यांना ठार केले
रायपूर - नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रासलेल्या छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर भागातील अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा नक्षलवाद्यांना ठार केले आहे. ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून 9 शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याचा धोका विचारात घेऊन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन प्रहार-2 या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. नारायणपूरमधील अबुझमाडच्या जंगलात उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एकूण सहा नक्षलवाद्यांना ठार केले. तसेच सुकमा परिसरातील नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला.
#FLASH: Six naxals killed by security forces in Narayanpur's Abujmarh in operation Prahaar 2 last evening #Chhattisgarh
— ANI (@ANI) November 7, 2017
#Chhattisgarh: Nine weapons recovered in Abujmarh encounter. Naxal camps destroyed in Sukma area by security forces
— ANI (@ANI) November 7, 2017