ISIS शी संबंधित 6 जणांना केरळमधून अटक
By admin | Published: October 3, 2016 08:46 AM2016-10-03T08:46:20+5:302016-10-03T08:46:20+5:30
देशभरात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या सहा तरुणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. 3 - देशभरात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या सहा तरुणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. केरळमधून 21 लोक बेपत्ता झाल्यापासून एनआयए तपास करत असून त्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले तरुण इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेले आहेत. अटक करण्यात आलेल्या तरुणांची ओळख पटली असून त्यांची नावे मंसीद इलियास उमर अल हिंदी, अबू बशीर इलियास राशिद. स्वालिह मोहम्मद टी इलियास युसूफ, सफवान पी, जसीम एनके आणि रमशाद नागीलन इलियास अशी आहेत.
अटक करण्यात आलेल्या सर्व तरुणांना सोमवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या कारवाईमध्ये एनआयएला केरळ, दिल्ली आणि तेलंगणा पोलिसांनी सहकार्य केलं. माहिती मिळाल्यानंतर केरळ, दिल्ली आणि तेलंगणा पोलिसांच्या मदतीने एनआयए या संशयितांवर लक्ष ठेवून होती अशी माहिती एनआयए प्रवक्त्यांनी दिली आहे.