कंडारी येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा छळ : पैशासाठी सुरू होता छळ

By admin | Published: January 24, 2016 10:19 PM2016-01-24T22:19:47+5:302016-01-24T22:19:47+5:30

जळगाव : तालुक्यातील कंडारी येथील आरती सुनील धनगर (वय १९ ) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन सासरच्या सहा जणांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Six people have been subjected to torture in Kandari's suicide attempt: persecution for money | कंडारी येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा छळ : पैशासाठी सुरू होता छळ

कंडारी येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा छळ : पैशासाठी सुरू होता छळ

Next
गाव : तालुक्यातील कंडारी येथील आरती सुनील धनगर (वय १९ ) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन सासरच्या सहा जणांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी बारा वाजता घरासमोरच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आरतीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचे वडील कृष्णा रामचंद्र धनगर यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद देऊन त्यात म्हटले आहे की, १४ मे २०१५ रोजी विवाह झाल्यापासून माहेेरुन ४० हजार रुपये आणावे व स्वयंपाक येत नाही म्हणून आरतीचा शारीरीक व मानसिक छळ केला जात होता. सासरच्या मंडळीनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पती सुनील राजधर धनगर, सासरे राजधर भिका धनगर, सासू वंदना राजधर धनगर, नणंद शीतल आनंदा धनगर, सुरेखा राजधर धनगर, सरला राजधर धनगर यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, उपनिरीक्षक अशोक खरात हे तपास करीत आहेत.

Web Title: Six people have been subjected to torture in Kandari's suicide attempt: persecution for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.