राष्ट्रकुल घोटाळ्यात ६ जणांना कारावास
By admin | Published: September 2, 2015 11:33 PM2015-09-02T23:33:11+5:302015-09-02T23:33:11+5:30
संपूर्ण देशभर गाजलेल्या सन २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा आयोजनादरम्यानच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने बुधवारी पहिली शिक्षा सुनावली
नवी दिल्ली : संपूर्ण देशभर गाजलेल्या सन २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा आयोजनादरम्यानच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने बुधवारी पहिली शिक्षा सुनावली. या घोटाळ्याशी संबंधित पथदिवे खरेदी गैरव्यवहाप्रकरणी न्यायालयाने दिल्ली महापालिकेच्या (एमसीडी)चार अधिकांऱ्यांसह एकूण सहा दोषींना चार ते सहा वर्षांच्या कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.
विशेष सीबीआय न्यायाधीश ब्रजेश गर्ग यांच्या न्यायालयाने बुधावारी दोषींना शिक्षा ठोठावली. एमसीडीचे अधीक्षक अभियंता डी.के. सुगन, कार्यकारी अभियंता ओपी माहला, लिपिक राजू व्ही आणि एमसीडीचा निविदा लिपिक गुरुचरण सिंह तसेच स्वेका पॉवरटेक इंजिनिअरिंग प्राय. लिमिटेड या खासगी कंपनीचे संचालक जेपी सिंह यांना प्रत्येकी चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली, तर याच कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक टी.पी. सिंह यास सहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)