धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 09:42 AM2024-05-15T09:42:33+5:302024-05-15T09:44:11+5:30
बस आणि ट्रकच्या धडकेत दोन्ही गाड्यांना भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
आंध्र प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापटला जिल्ह्यातील हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर बुधवारी आज पहाटे बस आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.
तेलंगणाची राजधानी बापटलाहून हैदराबादला जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसली, यात सहा सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात ३२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसत आहे. या धडकेमुळे लागलेली आग इतकी भीषण होती की बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवानही आग विझवताना दिसत आहेत.
बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून एक खासगी बस हैदराबादला जात होती. त्यानंतर हैदराबाद-विजयवाडा महामार्गावरील चिलकलुरीपेट मंडळाजवळ बस ट्रकला धडकली. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अपघाताच्या वेळी बसमध्ये ४२ जण प्रवास करत होते. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात ट्रक आणि बस चालकाचा मृत्यू झाला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य चार जणांनाही आपला जीव गमवावा लागला.
रस्ते अपघातात जीव गमावलेल्या लोकांचीही माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेले बापटला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये ३५ वर्षीय बस चालक अंजी, ६५ वर्षीय उपपगुंडूर काशी, ५५ वर्षीय उपपगुंडूर लक्ष्मी आणि मुप्पाराजू ख्याती सासरी नावाच्या ८ वर्षीय मुलीचा समावेश आहे. उर्वरित दोन जणांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
5 individuals burned alive, many injured as a private bus collides with a lorry and catches fire in #Chilakaluripet Mandal, #Palnadu district. The bus was carrying 40 passengers returning to #Hyderabad from #Bapatla district after casting their votes. #BusFire#BusAccidentpic.twitter.com/rnycRD4jQt
— Glint Insights Media (@GlintInsights) May 15, 2024