"दृश्यम" पाहिल्यानंतर केली सहा जणांची हत्या

By admin | Published: May 24, 2017 08:14 AM2017-05-24T08:14:09+5:302017-05-24T08:17:01+5:30

अजय देवगणचा "दृश्यम" चित्रपट पाहिल्यानंतर आरोपीने हत्येचा कट रचत एक कुटुंबच संपवून टाकलं आहे

Six people were killed after seeing "Visible" | "दृश्यम" पाहिल्यानंतर केली सहा जणांची हत्या

"दृश्यम" पाहिल्यानंतर केली सहा जणांची हत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - बीएसपी नेता मुनव्वर हसन आणि त्यांच्या संपुर्ण कुटुंबाची हत्या करणारा मुख्य आरोपी बंटीची चौकशी केली असता धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय देवगणचा "दृश्यम" चित्रपट पाहिल्यानंतर बुराडी येथे मुनव्वरसहित सहा जणांची हत्या करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे त्याप्रमाणे त्याने या हत्या केल्या. यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सर्व गोष्टी तशाच्या तशा करत त्याने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. 
 
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटीने एक, दोनदा नाही तर पाच वेळा "दृश्यम" चित्रपट पाहिला. पहिल्यांदा त्याने मल्टीप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहिला. यानंतर चित्रपटातील सीन्स सारखे त्याच्या डोक्यात फिरत होते. यानंतर एकदा टीव्हीवरही त्याने हा चित्रपट पाहिला. हत्या करण्यात आल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी काय काय करता येईल यासाठी वारंवार तो हा चित्रपट पाहत होता. 
 
बंटीने चित्रपट पुर्णपणे पाठच केला होता असं म्हणलं तरी हरकत नाही. यानंतर त्याने हत्येचा कट रचला. हत्या झाल्यानंतर पोलीस सर्वात आधी मोबाईल लोकेशनची माहिती काढेल याची त्याला कल्पना होती. म्हणूनच मेरठमध्ये इशरत आणि तिच्या दोन मुली आरजू आणि आर्शीची हत्या करताना त्याने मोबाईल जवळ ठेवला नाही. सुपारी देऊन बोलावलेल्या हल्लेखोरांनाही त्याने मोबाईल न बाळगण्याचा आदेशच दिला होता. आपण कुटुंबाच्या सर्वात जवळचे असल्याने आपल्यावर पोलिसांना संशय असेल याची त्याला पुर्ण खात्री होती. 
 
बीएसपी नेता चौधरी मुनव्वर हसन यांच्यासहित त्यांच्या कुटुंबातील सहा जणांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. मुनव्वर यांचा सर्वात खास मित्र शाहिद उर्फ बंटी या हत्याकांडाचा मास्टरमाइंड निघाला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मुनव्वर आणि त्याच्या कुटुंबियांची हत्या करुन तुकडे केल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. तीन दिवसांत सहा हत्या करत त्याने एक कुटुंबच संपवून टाकलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बंटीव्यतिरिक्त त्याचा मित्र दिपक आणि सुपारी किलर फिरोज आणि जुल्फीकार यांचाही समावेश आहे. इतर दोन आरोपींचा शोध पोलीस करत आहेत. 
 
 शाहिद खान उर्फ बंटी याने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने सर्वात आधी मुनव्वर यांची पत्नी आणि दोन मोठ्या मुलींची हत्या करुन मेरठच्या दौराला गावाजवळ मृतदेह नष्ट केले. यानंतर मुनव्वर यांच्या दोन छोट्या मुलांची गळा दाबून हत्या करत बुराडी येथील संतनगरमधील एका जुन्या बंगल्यात खड्डा खोदून जमिनीखाली मृतदेह पुरण्यात आले. 
 
 20 लाखांची रक्कम आणि संपुर्ण संपत्ती हडपण्याचा डाव आखत हा हत्याकांड घडवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याशिवाय वैयक्तित वादही असण्याची शक्यता आहे. पोलीस अद्याप तपास करत आहे. 
 
 पोलीस तपासात बंटीने सांगितलं की, मुनव्वरने त्याच्याकडून 20 लाख रुपये घेतले होते. वारंवार मागणी करुनही पैसे परत करत नव्हता. याशिवाय मुनव्वरने एका फ्लॅटवर कब्जा केला होता. पैसे मागितल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी वारंवार मुनव्वर देत असल्याने बंटीला प्रचंड चीड आली होती. याचवर्षी 19 जानेवारी रोजी एका बलात्कार प्रकरणात मुनव्वरला अटक झाल्यानंतर कुटंबाची देखरेख करणा-या बंटीने हत्येचा हा कट रचला.
 

Web Title: Six people were killed after seeing "Visible"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.