मध्य प्रदेशमधल्या सिवनीमध्ये ट्रकनं 6 जणांना उडवलं

By admin | Published: October 10, 2016 08:06 PM2016-10-10T20:06:50+5:302016-10-10T20:06:50+5:30

मध्य प्रदेशातील लखनादौन येथे भरधाव ट्रकने घटविसर्जनाला जाणार्‍या भाविकांना चिरडल्याची भयंकर घडना समोर आली आहे.

Six people were killed by truck in Seoni, Madhya Pradesh | मध्य प्रदेशमधल्या सिवनीमध्ये ट्रकनं 6 जणांना उडवलं

मध्य प्रदेशमधल्या सिवनीमध्ये ट्रकनं 6 जणांना उडवलं

Next

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. 10 - मध्य प्रदेशातील लखनादौन येथे भरधाव ट्रकने घटविसर्जनाला जाणार्‍या भाविकांना चिरडल्याची भयंकर घडना समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, 15 जण गंभीर जखमी आहेत.

लखनादौनपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या परासिया गावाजवळ ही दुर्घटना घडल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना जबलपूर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

लखनादौनचे टीआय शिवराज सिंह यांनी सांगितले की, नरसिंहपूर फोरलेन महामार्गावरील बंजारी माता मंदिरासमोर ही दुर्घटना घडली. सर्व भाविक घटविसर्जनासाठी निघाले होते. त्याचवेळी समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले आणि 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Six people were killed by truck in Seoni, Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.