केंद्रीय माहिती आयोगातील सहा पदे आजपासून होणार रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 03:36 AM2020-09-25T03:36:44+5:302020-09-25T03:37:02+5:30
अर्ध्या सदस्यांवरच कारभार : यशवर्धनकुमार सिन्हा नवे मुख्य माहिती आयुक्त होण्याची शक्यता
हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच त्याच्यावर निम्म्या सदस्यांच्या बळावर कार्यरत राहाण्याची वेळ येणार आहे. या आयोगाच्या अकरा सदस्यांपैकी सर्वात वरिष्ठ सदस्य व माहिती आयुक्त दिव्यप्रकाश सिन्हा यांच्यासह पाच सदस्य उद्या, शुक्रवारी निवृत्त होत आहेत. मुख्य माहिती आयुक्तांचे पद आधीपासूनच रिकामे आहे. त्यामुळे या आयोगातील एकूण सहा जागा आता रिक्त होणार आहेत. मुख्य माहिती आयुक्तपदी परराष्ट्र खात्याच्या सेवेतील माजी अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
तत्कालीन मुख्य माहिती आयुक्त बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर त्या पदावर आतापर्यंत नव्या व्यक्तीची नेमणूक केंद्र सरकारने केली नव्हती. सर्वात वरिष्ठ असलेल्या दिव्यप्रकाश सिन्हा यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली नव्हती.
आश्वासन पाळण्यासाठी हालचाली
च्केंद्रीय माहिती आयोगातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करावी, असा नियम अस्तित्वात नाही.
च्आयोगातील सदस्यांपैकी नीरज गुप्ता हे आयएएस अधिकारी मोदी सरकारच्या मर्जीतील असल्याचे मानले जाते. तेही मुख्य माहिती आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत.