सहा उपग्रहांचे प्रक्षेपण

By admin | Published: December 17, 2015 01:02 AM2015-12-17T01:02:49+5:302015-12-17T01:02:49+5:30

भारताने बुधवारी पीएसएलव्ही- सी २९ या प्रक्षेपकांद्वारे सिंगापूरचे सहा उपग्रह अवकाशात पाठवत इतिहास घडविला आहे. ध्रुवीय प्रक्षेपकाने पार पाडलेले ५० वे यशस्वी मिशन होते.

Six satellites projection | सहा उपग्रहांचे प्रक्षेपण

सहा उपग्रहांचे प्रक्षेपण

Next

श्रीहरीकोटा : भारताने बुधवारी पीएसएलव्ही- सी २९ या प्रक्षेपकांद्वारे सिंगापूरचे सहा उपग्रह अवकाशात पाठवत इतिहास घडविला आहे. ध्रुवीय प्रक्षेपकाने पार पाडलेले ५० वे यशस्वी मिशन होते. या प्रक्षेपणामुळे अंतराळ व्यवसायाला नवी झळाळी लाभणार आहे.
सिंगापूरच्या या उपग्रहांमुळे आपत्ती व्यवस्थापन आणि नगर नियोजनाबाबत माहिती गोळा करण्यास मदत होणार आहे. सिंगापूर- भारताच्या दूतावासीय संबंधांच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त हा योग जुळवून आणण्यात आला. यावर्षी इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने खास व्यावसायिक प्रक्षेपणांची यशस्वी हॅट्ट्रिक साधली आहे. जुलै आणि सप्टेंबरमधील मिशनच्यावेळी ११ उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले होते. त्यात अमेरिका आणि ब्रिटन या देशांच्या उपग्रहांचाही समावेश होता. संध्याकाळी ६ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्हीचे बरहुकूम प्रक्षेपण करण्यात आले. २१ मिनिटांत ५५० कि.मी. वर्तुळाकार कक्षेत एका पाठोपाठ उपग्रह सोडले गेले, असे इस्रोने एका निवेदनात नमूद केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Six satellites projection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.