इस्रो प्रक्षेपित करणार सिंगापूरचे सहा उपग्रह

By admin | Published: December 15, 2015 03:09 AM2015-12-15T03:09:43+5:302015-12-15T03:09:43+5:30

भारतीय अंतराळ संशोधन संघटना(इस्रो) सिंगापूरचे सहा उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजता पीएसएलव्ही-सी २९/टीईएलईओएस-१ या प्रक्षेपण मोहिमेचे

Six satellites from Singapore to launch ISRO | इस्रो प्रक्षेपित करणार सिंगापूरचे सहा उपग्रह

इस्रो प्रक्षेपित करणार सिंगापूरचे सहा उपग्रह

Next

चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संघटना(इस्रो) सिंगापूरचे सहा उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजता पीएसएलव्ही-सी २९/टीईएलईओएस-१ या प्रक्षेपण मोहिमेचे ५९ तासांचे काऊंटडाऊन सुरू झाले. येत्या बुधवारी श्रीहरिकोटास्थित धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी ६ वाजता या उपग्रहांचे प्रक्षेपण होईल. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकलद्वारे हे उपग्रह अंतराळात सोडले जातील.
इस्रोने ही माहिती दिली. पीएसएलव्हीचे हे ३२ वे उड्डाण असेल. या उड्डाणाद्वारे सहा उपग्रह नियोजित कक्षेत स्थापन केले जातील. या सहा उपग्रहांमध्ये ४०० किलोग्रॅम वजनाचा टीईएलईओएस-१ हा प्राथमिक उपग्रह आहे. अन्य पाच उपग्रहांमध्ये दोन मायक्रो आणि तीन नॅनो उपग्रह आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Six satellites from Singapore to launch ISRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.