साडे सहा हजार उद्योगांमुळे ४८ हजार युवकांना रोजगार जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी : दोन हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Published: February 1, 2016 12:03 AM2016-02-01T00:03:21+5:302016-02-01T00:03:21+5:30

जळगाव : जिल्ह्यात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फारशी चालना नसली तरी जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी असलेल्या सहा हजार ६७० उद्योगांच्या माध्यमातून ४८ हजार ५१५ कामगारांच्या हातांना काम मिळाले आहे. जिल्हाभरात विविध उद्योगांमध्ये जवळपास एक हजार ९५४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

For six thousand industries, 48 ​​thousand youths are registered with District Industry Centers: Investment of two thousand crores | साडे सहा हजार उद्योगांमुळे ४८ हजार युवकांना रोजगार जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी : दोन हजार कोटींची गुंतवणूक

साडे सहा हजार उद्योगांमुळे ४८ हजार युवकांना रोजगार जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी : दोन हजार कोटींची गुंतवणूक

Next
गाव : जिल्ह्यात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फारशी चालना नसली तरी जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी असलेल्या सहा हजार ६७० उद्योगांच्या माध्यमातून ४८ हजार ५१५ कामगारांच्या हातांना काम मिळाले आहे. जिल्हाभरात विविध उद्योगांमध्ये जवळपास एक हजार ९५४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
साडे सहा हजार उद्योगांची नोंदणी
जिल्हा उद्योग केंद्राकडे नोव्हेंबर २०१५ अखेरपर्यंत तब्बल सहा हजार ६७० लघु, मध्यम व सुक्ष्म स्वरुपांच्या उद्योगांची नोंदणी करण्यात आली आहे. ४८ हजार ५१५ जणांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. या उद्योगांसाठी एक हजार ९५४ कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योजकांनी केली आहे. ४४ हजार २९२ कोटी रुपयांचे उत्पादन या उद्योगांच्या माध्यमातून होत आहे.
प्लास्टिक व चटई उद्योगांचा देशविदेशात ठसा
जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राची एक वेगळी ओळख प्लास्टिक उद्योगामुळे निर्माण झाली आहे. जळगाव शहरातील औद्योगिक क्षेत्रातील १२५९ उद्योगांपैकी जवळपास ६०० उद्योग हे प्लास्टिकपासून निर्मिती होणार्‍या विविध वस्तूंचे उत्पादन करत असतात. यात प्रामख्याने पाईप निर्मिती उद्योग व चटई निर्मिती उद्योगाचा समावेश आहे. देशातील अनेक भागात जळगावातून निर्मिती होणारे पाईप हे जात असतात. तर चटई उद्योगाने विदेशातही आपल्या उत्पादनांचा ठसा उमटविला आहेे. दुबईसह विविध देशांमध्ये या क्षेत्रातून चटईंची निर्यात होते. या क्षेत्रातून सुमारे तीन ते चार हजार कामगारांच्या हातांना काम मिळालेले आहे.
या उद्योगांमुळे जळगावचे नाव सातासमुद्रापार
जळगावच्या औद्योगिक क्षेत्राला नावारूपाला आणणार्‍या उद्योगांमध्ये जैन उद्योग समुह, रेमंड, सुप्रीम, फाउंडेशन ब्रेक्स म्युफॅˆरींग लिमिटेड, एमको कंपनी लिमिटेड, लिग्रांड लिमिटेड, कोगटा दाल मिल अशा काही मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात तयार होणार्‍या चटई आणि प्लास्टीक पाईप निर्मितीच्या उद्योगामुळे जळगाव जिल्ह्याचे संपूर्ण देशामध्ये नावलौकिक झाला आहे.

अन्न उत्पादन व प्रक्रियेवर मोठी गुंतवणूक
जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी असलेल्या उद्योगांमध्ये कृषी, टेक्सटाईल्स्, पेपर ॲण्ड पेपर प्रॉडक्ट, संगणक व त्यासंबधीत स्पेअर पार्टची निर्मिती, इलेक्ट्रीक, गॅस आणि गरम पाण्यासंबधीच्या यंत्रांची निर्मिती, जलशुद्धीकरण करणार्‍या लघु, सुक्ष्म व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांनी नोंदणी केली आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील करण्यात आली आहे.

Web Title: For six thousand industries, 48 ​​thousand youths are registered with District Industry Centers: Investment of two thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.