६६ वर्षांमध्ये सहा महिला न्यायाधीश

By admin | Published: April 5, 2016 12:01 AM2016-04-05T00:01:53+5:302016-04-05T00:01:53+5:30

महिलांसाठी आज ना उद्या शनी मंदिराची दारे निश्चितच उघडली जातील, मात्र न्यायमंदिराची दारे गेली दशकानुदशके उघडी असतानाही सर्वोच्च

Six women judges in 66 years | ६६ वर्षांमध्ये सहा महिला न्यायाधीश

६६ वर्षांमध्ये सहा महिला न्यायाधीश

Next

नवी दिल्ली : महिलांसाठी आज ना उद्या शनी मंदिराची दारे निश्चितच उघडली जातील, मात्र न्यायमंदिराची दारे गेली दशकानुदशके उघडी असतानाही सर्वोच्च न्यायालयांमध्ये महिला न्यायाधीशांची संख्या (अवघी सहा) बोटावर मोजण्याएवढीच का? हा चर्चेचा विषय बनला आहे.
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यात आल्यानंतर न्या. जे.एस. खेहार यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने न्यायाधीशांच्या निवड प्रक्रियेत कोणत्या सुधारणांची गरज आहे याचा अभ्यास चालविला आहे. न्यायाधीशांची निवड करणाऱ्या कॉलेजियमने महिला वकिलांची न्यायाधीश म्हणून निवड करताना त्यातील अडसर दूर करायलाच हवे, अशी मागणी महिला वकिलांनी केली.

Web Title: Six women judges in 66 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.