सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:11 AM2024-05-24T06:11:39+5:302024-05-24T06:12:57+5:30
सहाव्या टप्प्यात बिहार (८), हरयाणा (१०), झारखंड (४), ओडिशा (६), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (८), दिल्ली (७) व जम्मू काश्मीर (१) मतदान होणार आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी राजधानी दिल्लीतील सर्व ७ आणि हरयाणातील सर्व १० जागांसह आठ राज्यांतील ५८ मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. त्यानिमित्त धडाडत असलेल्या प्रचारतोफा गुरूवारी सायंकाळी शांत झाल्या. या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार रिंगणात आहेत.
सहाव्या टप्प्यात बिहार (८), हरयाणा (१०), झारखंड (४), ओडिशा (६), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (८), दिल्ली (७) व जम्मू काश्मीर (१) मतदान होणार आहे.
त्यापैकी सर्वाधिक लक्ष लागले आहे, ते राजधानी दिल्लीकडे. येथील सात मतदारसंघांत भाजप विरुद्ध काॅंग्रेस-आप यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. दरम्यान, ओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी ४२ जागांसाठी मतदान होणार आहे.
अनंतनागमध्ये उद्या मतदान
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार होते. प्रतिकूल हवामानामुळे अनेक पक्षांनी मतदान पुढे ढकलायची मागणी केली होती. त्यानुसार येथे शनिवारी मतदान होत आहे.