एकाला महिन्यात सहाच रेल्वे तिकिटे
By admin | Published: January 30, 2016 04:16 AM2016-01-30T04:16:39+5:302016-01-30T04:16:39+5:30
आॅनलाईन तिकिटांतील गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवाशांना एका महिन्यात आता सहाच
मुंबई : आॅनलाईन तिकिटांतील गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवाशांना एका महिन्यात आता सहाच तिकिटे काढता येणार आहेत. या नव्या नियमाची अंमलबजावणी १५ फेब्रुवारीपासून केली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या एका प्रवाशाकडून महिन्याभरात दहा तिकिटे काढली जातात.
मेल-एक्स्प्रेसची आॅनलाईन तिकिटे काढताना मोठ्या प्रमाणात अनधिकृतबरोबरच अधिकृत दलालांकडूनही गैरप्रकार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या एका महिन्यात एका प्रवाशाला दहा तिकिटेच काढण्याचे बंधन आहे. रेल्वेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ९0 टक्के युजर्स हे महिन्याभरात प्रत्येकी सहा तिकिट तर दहा टक्के युजर्स हे महिन्याभरात ६ पेक्षा जास्त तिकिट काढतात. हे पाहता यातील दहा टक्के युजर्स हे तिकिट दलाली करणाऱ्यांमधील असल्याचा अंदाज यातून बांधण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेकडून एका प्रवाशाला महिन्याभरात फक्त सहाच तिकिटे काढण्याचा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येक प्रवासी प्रत्येक दिवशी आपल्या युजर्स आयडीवरुन फक्त दोन तिकिट (एआरपी-अॅडव्हान्स रिर्जर्व्हेशन तिकिट)काढू शकणार आहे. तर तत्काळसाठीही हाच नियम असेल. त्याचप्रमाणे सकाळी आठ ते बारा या वेळेत ई-वॉलेट किंवा कॅश कार्डमार्फत आरक्षण करता येणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
सध्याची तरतूद
सर्व प्रकारचे अधिकृत दलाल पहिल्या अर्धा तासांत तिकिटांचे आरक्षण करु शकतात.
यात सकाळी आठ ते ८.३0 या वेळेत जनरल आरक्षण
सकाळी दहा ते साडे दहा आणि अकरा ते साडे अकरा या वेळेत एसी आणि नॉन एसीचे तत्काळ आरक्षण करु शकतात.
90 टक्के युजर्स हे प्रत्येकी सहा तिकिट तर दहा टक्के युजर्स हे महिन्याभरात ६ पेक्षा जास्त तिकिट काढतात. असे रेल्वेकडून
करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात आढळले आहे.