#sixwordstories : सोशल मीडियावरील नवा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 09:24 AM2016-06-10T09:24:19+5:302016-06-10T12:26:59+5:30

सोशल मीडियावर सध्या 'sixwordstories' (सहा शब्दांतील गोष्ट) हा नवा ट्रेंड आला असून त्यामध्ये तुमच्या मनातील भावना, विचार व एखादी गोष्ट अवघ्या ६ शब्दांत मांडावी लागते

#sixwordstories: New Trends on Social Media | #sixwordstories : सोशल मीडियावरील नवा ट्रेंड

#sixwordstories : सोशल मीडियावरील नवा ट्रेंड

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० - सोशल मीडियावर सध्या ' sixwordstories' ( सहा शब्दांत गोष्ट) हा नवा ट्रेंड आला असून त्यामध्ये तुमच्या मनातील भावना, विचार व एखादी गोष्ट अवघ्या ६ शब्दांत मांडावी लागते. सध्याच्या तरूणाईसह लहान -मोठे, थोर सर्वजण या ट्रेंडमध्ये गुंतलेले दिसत असून अवघ्या ६ शब्दांत कल्पक रितीने आपले विचार मांडण्याची व अर्थपूर्ण गोष्ट सांगण्याची  चढाओढ नेटक-यांमध्ये लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा ट्रेंड सुरू असून फेसबूक, ट्विटर, जिथे बघाव तिथे #sixwordstories या हॅशटॅगसह नेटकरी आपले विचार मांडत आहेत. मात्र ब-याच जणांना हे 'sixwordstories' प्रकरण नेमके काय आहे हेच माहीत नाही. हा ट्रेंड का, कधी, कसा सुरू झाला हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

काय आहे MySixwordStory?
 
१९व्या शतकात हा लेखनप्रकार प्रकाशझोतात आला.  अमेरिकेतील एक प्रसिद्ध लेखक व पत्रकार अर्नेस्ट हेंमिग्वे यांच्याकडून या 'SixwordStory'ची सुरूवात झाली. ' एखादी व्यक्ती कितीही मोठी लेखक बनली तरी लोक त्याला मोठं समजत नाही' असे हेंमिग्वे यांनी आपल्या इतर लेखक मित्रांना सांगितले. त्याच्या सहका-यांना मात्र हेमिंग्वेचे हे वक्तव्य पटले नाही आणि त्यांनी त्याची खिल्ली उडवत त्याला ' अवघ्या ६ शब्दांध्ये एखादी कहाणी (गोष्ट) लिहून दाखवण्याचे आव्हान दिले. हेमिंग्वे यांनी ते आव्हान स्वीकारले आणि ६ शब्दांत एक गोष्ट लिहीली. ती होती, 'For sale: baby shoes, never worn.  (अर्थ - विक्रीस उपलब्ध :बाळाचे बुट, कधीच न घातलेले.)' अवघ्या ६ शब्दांत हेमिंग्वेने लिहीलेली ही गोष्ट सर्वांना खूप भावली आणि हेमिंग्वेनी अट जिंकली. तेव्हापासूनच 'siwordstories'चा हा ट्रेंड, नवी कला सुरू झाली आणि ९०च्या दशकात अनेक जण आपल्या भावना ६ शब्दांच्या गोष्टीच्या माध्यमातून व्यक्त करू लागले. 
 
आता पुन्हा MySixwordStoryचा ट्रेंड का?
हे एवढं सगळं वाचल्यावर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हेमिंग्वेच्या निधनानंतर आता इतक्या काळाने हा प्रकार आत्ता पुन्हा ट्रेंडमध्ये येण्याचं कारण काय? तर त्याचं खरं कारण म्हणजे २ जुलै रोजी हेमिंग्वे यांची पुण्यतिथी असते आणि त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ हा '६ शब्दांचा' लेखनप्रपंच पुन्हा सुरू करण्यात आला असून सध्या तो ट्रेंडमध्ये आला आहे. 'Six Word Stories' नावाची एक वेबसाईटही असून २००८ साली पीट बर्ग यांनी ती साईट सुरू केली होती. हेंमिग्वेच्या लेखनप्रकाराचा वारसा पुढे नेणे हाच त्या साईटचा उद्देश होता. आणि आता याच (Six Word Stories) नावाने फेसबूकवर एक पेजही सुरू करण्यात आले असून तेथे अनेक युझर्स आपल्या ६ शब्दातील गोष्टी पोस्ट करत आहेत. तसेच ट्विटरवरही 'six word stories' हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून तिथेही अनेक ट्विटरकर नेमक्या शब्दांतून आपल्या भावना मांडत आहेत.
 
 

Web Title: #sixwordstories: New Trends on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.