चीनशी युद्ध झाल्यास शिया मुसलमान भारतासाठी प्राण देण्यासही तयार; धर्मगुरुचं पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:18 PM2020-09-15T13:18:11+5:302020-09-15T13:20:56+5:30

देशाच्या सीमा रक्षणासाठी जो काही निर्णय घेतला जाईल त्यासोबत आम्ही आहोत. आमचा समुदाय भारतच्या संरक्षणासाठी प्राणही देण्यास मागे हटणार नाही असं कल्बे जवाद यांनी पत्रात म्हटलं आहे.

Siya Muslim Ready To Sacrifice Lives In War With China, Kalbe Jawad Wrote To PM Narendra Modi | चीनशी युद्ध झाल्यास शिया मुसलमान भारतासाठी प्राण देण्यासही तयार; धर्मगुरुचं पंतप्रधानांना पत्र

चीनशी युद्ध झाल्यास शिया मुसलमान भारतासाठी प्राण देण्यासही तयार; धर्मगुरुचं पंतप्रधानांना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देकारगिल युद्धात शिया मुसलमानांनी भारतीय सैन्याला पूर्णपणे मदत केली होती. संपूर्ण देशभरातील शिया मुसलमान नेहमी भारतीय सीमेच्या संरक्षणासाठी तयारदेशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिक एक सैनिक बनण्यासाठी तयार

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इमाम ए जुमा आणि शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. चीनने जे भारतीय सैन्यासोबत अमानुष वर्तवणूक केली त्याचं उत्तर भारतीय जवानांनी चीनला सडेतोड दिलं, यापुढेही जवान चीनला उत्तर देण्यास सक्षम आहेत. ज्यारितीन कारगिल युद्धात शिया मुसलमानांनी भारतीय लष्काराला पूर्णपणे सहकार्य केले तसेच चीनसोबत युद्ध झाल्यास देशातील शिया मुसलमान एकत्र देशासोबत उभे राहू. देशाच्या रक्षणासाठी शिया मुसलमान जीवाची बाजी लावण्यासही तयार आहेत असं त्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे.

कल्बे जवाद यांनी पत्रात लिहिलं आहे की, तुमचं आरोग्य चांगले असेल ही अपेक्षा आहे. या पत्राच्या माध्यमातून इतकचं सांगतो, गेले काही दिवस भारत आणि चीन यांच्यात सीमेवर विशेषत: गलवान खोऱ्यात जो संघर्ष सुरु आहे. आपले सैनिक चीनला जशात तसे उत्तर देत आहेत. धाडसाने भारतीय जवान या संघर्षाचा सामना करत आहे. यापुढेही सैन्य सक्षम आहेत. युद्ध आपल्या सीमेवर घोंगावत आहे. देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिक एक सैनिक बनण्यासाठी तयार आहे. कारगिल युद्धातही प्रत्येक नागरिकाने भारतीय लष्कराला साथ दिली आहे असं ते म्हणाले.

कारगिल युद्धात शिया मुसलमानांनी भारतीय सैन्याला पूर्णपणे मदत केली होती. त्याचप्रकारे लेह आणि लडाखमधील शिया भारतासोबत आणि चीनविरोधात प्रत्येक पावलावर उभे राहतील. फक्त लेह, लडाख आणि कारगिल नव्हे तर संपूर्ण देशभरातील शिया मुसलमान नेहमी भारतीय सीमेच्या संरक्षणासाठी तयार आहेत. देशाच्या सीमा रक्षणासाठी जो काही निर्णय घेतला जाईल त्यासोबत आम्ही आहोत. आमचा समुदाय भारतच्या संरक्षणासाठी प्राणही देण्यास मागे हटणार नाही असं कल्बे जवाद यांनी पत्रात म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींचा चीनला संदेश

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद झाला. यावेळी मोदी म्हणाले, आज आपले वीर जवान सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी उभे आहेत. हे सभागृह आणि सभागृहातील सर्व सदस्य एका आवाजात, एका भावनेने, एक संदेश देतील, की संपूर्ण देश भारतीय जवानांच्या पाठीशी उभा आहे.

दुसऱ्या मार्गाने भारताविरोधात कट रचण्याचा चीनचा प्रयत्न

पूर्व लडाखमध्ये LAC वर गेल्या तीन महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. भारतीय जवानांनी चीनला त्याच्याच हद्दीत रहायला भाग पाडले आहे. यामुळे चीन आता दुसऱ्या मार्गाने भारताविरोधात कट रचत आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एक मोठा खुलासा झाला आहे. या वृत्तानुसार, चीन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अशा देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी करत आहे.

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. चीन सरकार काही कंपन्यांच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच शेनजेन ही कंपनी भारतात तब्बल 10 हजार लोकांची हेरगिरी करत असून, या कंपनीचा चीन सरकार आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी थेट संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने टिकटॉकसह शेकडो चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही हेरगिरी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.   

Web Title: Siya Muslim Ready To Sacrifice Lives In War With China, Kalbe Jawad Wrote To PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.