कुशल भारत साकारू
By admin | Published: June 12, 2014 03:00 AM2014-06-12T03:00:33+5:302014-06-12T05:39:07+5:30
जगात देशाची ओळख ‘स्कॅम इंडिया’ (घोटाळ्यांचा देश) अशी नव्हे, तर ‘स्किल्ड इंडिया’ (कुशल भारत) अशी असायला हवी़
नवी दिल्ली : जगात देशाची ओळख ‘स्कॅम इंडिया’ (घोटाळ्यांचा देश) अशी नव्हे, तर ‘स्किल्ड इंडिया’ (कुशल भारत) अशी असायला हवी़ नव्या सरकारचे हेच ध्येय आहे़ राष्ट्रपतींच्या मुखातून निघालेला शब्द माझ्या सरकारसाठी पवित्र बंधन आहे आणि तो निभवण्यास मी आणि माझे सरकार कटिबद्ध आहे़ विरोधक संख्येने कितीही असो, सरकार त्यांना घेऊन पुढे जाईल़ मुस्लिमांसह सर्वांचा विकास आणि गरिबी निर्मूलन हे माझ्या सरकारचे कर्तव्य आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात दिली़
मोदींच्या संसदेतील पहिल्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते़ आज बुधवारी लोकसभा व राज्यसभेत मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले़ भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार गरिबांसाठी जगेल आणि गरिबांसाठी काम करेल, असे आश्वासन त्यांनी संपूर्ण जनतेला दिले़ माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीला संसद समजून घेईल, अशी मी आशा करतो़, अशा शब्दांत मोदींनी लोकसभेतील आपल्या भाषणाला सुरुवात केली़ संसदेत बसलेले माझे वरिष्ठ कुठल्याही पक्षाचे का असेना, त्यांचा आशीर्वाद आम्हाला अहंकारापासून वाचवेल़ विरोधकांची संख्या कितीही असो, पण मला तुमच्याशिवाय पुढे जायचे नाही़ कारण आपल्याला संख्याच्या बळावर नव्हे तर ऐक्याच्या बळावर पुढे जायचे आहे,अशा नम्र शब्दांनी सुरुवात करीत, मोदींनी अनेक मुद्यांना हात लावला़
२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला घर, घराघरांत वीज, पाणी आणि शौचालय यासाठी रालोआ सरकार यथाशक्ती प्रयत्न करेल़ आम्ही टीकेचे स्वागत करू कारण लोकशाहीत टीका बळ देते़ आम्ही थोरलेपणाचा आव मिरवणारे नाही़ आम्ही संवादात्मक संघवादावर विश्वास ठेवतो़ याच नात्याने राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील शब्द आमच्यासाठी प्रमाण आहेत़ ते खरे करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मोदी म्हणाले़
बलात्कारांवर मौन पाळा
राजकीय पक्षांना बलात्कारासारख्या महिलांच्या सन्मानाशी जुळलेल्या मुद्यावर राजकारण करणे शोभनीय नाही़ तेव्हा बलात्काराचे मनोवैज्ञानिक विश्लेषण थांबवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिला़ महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांंवर काही नेत्यांनी केलेल्या ताज्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते़ महिलांचा आदर आणि सुरक्षा आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य असले पाहिले़
बलात्काराच्या घटनांवर आक्षेपार्ह वक्तव्ये करणे शोभनीय आहे? आपण मौन बाळगू शकत नाही का? आपल्याला आत्मचिंतनासोबतच अशा घटनांविरुद्ध कारवाईही करायला हवी, असे ते म्हणाले़
विरोधकांवर ताशेरे