बापरे! त्वचा काळा पडली, उभं राहणंही अवघड; कुटुंबाला रहस्यमय आजाराचा विळखा, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 10:24 AM2023-01-21T10:24:09+5:302023-01-21T10:25:57+5:30

एक कुटुंब गंभीर आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्वचेचा रंग काळा पडत आहे.

skin color of all people of family in puwayan turns black teenager dies shahjahanpur | बापरे! त्वचा काळा पडली, उभं राहणंही अवघड; कुटुंबाला रहस्यमय आजाराचा विळखा, एकाचा मृत्यू

फोटो - अमर उजाला

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरच्या पुवायां भागातील बडागावमध्ये एक कुटुंब गंभीर आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्वचेचा रंग काळा पडत आहे. उपचार करूनही कोणालाच फायदा होत नाही. या कुटुंबातील एका मुलीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांची टीम कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे, परंतु अद्याप या आजाराचे कारण शोधू शकलेले नाही. कुटुंबीयांची आता जिल्हा रुग्णालयात चाचणी केली जाणार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

बडागाव येथील 50 वर्षीय सियाराम आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करतात. सहा महिन्यांपूर्वी सियारामचा मुलगा श्रीपाल याच्या अंगावर खाज यायला सुरुवात झाली. यानंतर त्वचेचा रंग काळा होऊ लागला. श्रीपाल यांनी प्रथम गावातच उपचार करून घेतले. काही फायदा होत नाही म्हणून शहाजहानपूरच्या खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू केले, पण हे वाढतच गेलं. यानंतर सियाराम, त्यांची पत्नी गुड्डी देवी, श्रीपाल यांची पत्नी देवराणी, मुलगा अनुज, मुलगी रीमा, भाऊ अवधेश आणि बहीण सीमा देवी यांनाही या आजाराने ग्रासले. सर्वांवर शाहजहांपूर येथील खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

आजारपणामुळे घाबरले कुटुंबीय 

श्रीपालची 17 वर्षांची बहीण शिवराणी हिचा 16 जानेवारीच्या रात्री मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवराणीचा मृत्यू त्वचा काळवंडण्याच्या आजारामुळे झाला आहे, असे त्यांचे मत आहे. माहिती मिळताच सीएचसीचे अधीक्षक डॉ.सुरेंद्र कुमार यांनी पथकासह मंगळवारी सियारामच्या घरी पोहोचून माहिती घेतली. बुधवारीही डॉक्टरांचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबीयांकडून आजाराची स्थिती जाणून घेतली. डॉक्टर अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. सीएचसी अधीक्षकांनी कुटुंबीयांवर पूर्ण उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे. पीडितांची तपासणी केली जाईल, जेणेकरून रोग आणि त्याचे कारण समजू शकेल, असे अधीक्षकांनी सांगितले.

शरीराची अवस्था पाहून डॉक्टरांना बसला धक्का

श्रीपाल यांनी सांगितले की, त्या लोकांच्या शरीरावर प्रथम छोटे छोटे फोड दिसतात. यानंतर शरीरात सूज येऊ लागते. हात-पाय चालणे कठीण झाले आहे. अशक्तपणा दिसू लागतो. डोळ्यातून पाणी येऊ लागते. शरीर कोरडे होते. उभे राहण्यासही त्रास होतो. श्रीपालच्या म्हणण्यानुसार, त्यांची बहीण शिवराणीचा या आजाराने मृत्यू झाला. भाई अवधेश यांना शाहजहांपूर येथील खासगी रुग्णालयातून लखनौला रेफर करण्यात आले. आरोग्य विभागाच्या संपर्कात आल्यानंतर अवधेशला घरी आणण्यात आले आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येईल. त्याची प्रकृती गंभीर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: skin color of all people of family in puwayan turns black teenager dies shahjahanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.