या 'तेराव्या' विमानामुळे 12 मिराज जेटचा पाकिस्तानवर यशस्वी 'एअर स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 07:27 AM2019-02-27T07:27:28+5:302019-02-27T07:28:35+5:30

पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या मिराज 2000 ची 12  लढाऊ विमाने भाव खाऊन गेली खरी, पण रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांच्यासाठी ढाल बनलेले तेरावे विमान पडद्यामागेच राहिले.

the sky Netra behind 12-Mirage Jet's successful 'Air Strike' on pakistan | या 'तेराव्या' विमानामुळे 12 मिराज जेटचा पाकिस्तानवर यशस्वी 'एअर स्ट्राईक'

या 'तेराव्या' विमानामुळे 12 मिराज जेटचा पाकिस्तानवर यशस्वी 'एअर स्ट्राईक'

googlenewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या मिराज 2000 ची 12  लढाऊ विमाने भाव खाऊन गेली खरी, पण रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांच्यासाठी ढाल बनलेले तेरावे विमान पडद्यामागेच राहिले. या विमानाचे नाव आहे नेत्रा. महत्वाचे म्हणजे हे अस्सल भारतीय बनावटीचे विमान आहे. 


नेत्रा हे विमान या मिराजच्या विमानांना मार्गदर्शन करण्याबरोबरच शत्रूकडून मिसाईल डागली गेल्याचेही सांगत होते. तसेच पाकिस्तानच्या लष्कराचे संभाषणही टिपून त्यांच्या हालचाली या वैमानिकांना कळवत होते. या ऑपरेशनमध्ये नेत्रा ने खूप मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, या विमानाची कामगिरी प्रकाशात आली नाही. नेत्रा हे हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा असलेले विमान आहे. हे विमान भारताच्या हवा ईहद्दीतच उडत होते. मात्र, लक्ष पूर्ण पाकिस्तानवर होते. 


सध्या भारताकडे या प्रकारची दोनच विमाने आहेत. या विमानाने मिराजच्या ताफ्याला त्यांच्यावर डागलेल्या मिसाईलची सूचना देत होते. यासाठी नेत्रामध्ये इन्फ्रारेड प्रणाली बसविण्यात आली होती, जी मिसाईल सोडल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या उष्णता टिपते. 


काय आहे नेत्रा? 
नेत्रा हे विमान भारतीय डीआरडीओच्या संशोधकांनी बनविले आहे. निवृत्त संशोधक आणि एअरबॉर्न सिस्टिमचे अध्यक्ष एस ख्रिस्तोफर यांनी हे विमान आणि प्रणाली विकसित करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे. या विमानामध्ये भारतीय बनावटीचे इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर बसविण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे या विमानाला एकही कॅमेरा नसून केवळ उच्च प्रतीच्या सेन्सरच्या माध्यामातून हे विमान पाकिस्तानच्या लष्कारचे संभाषण ऐकू शकते. तसेच भारतीय हद्दीत राहून पाकिस्तान सोडत असलेली मिसाईलचा अचूक अंदाज लावू शकते. 


नेत्रा शत्रूच्या प्रदेशात 450 ते 500 किमी दूरूनच लक्ष ठेवू शकते. यासाठी एअरबॉर्नला 120 डिग्रीचा व्ह्यू देण्यात आलेला आहे. नेत्रा रडारचे सिग्नलही पकडू शकते. हे विमान नवी दिल्लीमधील डेटा सेंटरला माहिती पाठविते. हे विमान एका वेळी 5 तास उडू शकते. शिवाय हवेतच इंधन भरल्यास 9 तासांचे उड्डाण करू शकते. 


सध्या भारतीय हवाई दलाला दोन विमाने देण्यात आली असून तिसरे विमान डीआरडीओकडे चाचणीसाठी बनविलेले आहे. नेत्रा या विमानची बांधणी 2007 मध्ये सुरु झाली. यासाठी 2460 कोटी रुपयांचा खर्च आला. पहिले विमान 2017 मध्ये हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. 
आज या विमानामध्ये केलेली गुंतवणूक फळाला आली, अशी प्रतिक्रिया ख्रिस्तोफर यांनी दिली आहे. 

Web Title: the sky Netra behind 12-Mirage Jet's successful 'Air Strike' on pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.