भारतात स्काइप लाइट सेवा 'आधार'शी जोडणार

By admin | Published: February 22, 2017 02:19 PM2017-02-22T14:19:39+5:302017-02-22T14:21:01+5:30

मायक्रोसॉफ्ट भारतात स्काइप लाइट सेवेला आधार कार्डशी जोडणार आहे.

Skype Light service in India will connect to 'Aadhae' | भारतात स्काइप लाइट सेवा 'आधार'शी जोडणार

भारतात स्काइप लाइट सेवा 'आधार'शी जोडणार

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - मायक्रोसॉफ्ट भारतात स्काइप लाइट सेवेला आधार कार्डशी जोडणार आहे. स्काइप लाइट सेवा भारतात सुरू करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी केली आहे. मोदींच्या डिजिटल इंडियाच्या योजनेला चालना देण्यासाठीच सत्या नाडेला यांनी ही सेवा भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमात त्यांनी भारतातील कंपन्यांच्या फायद्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग सुविधेची माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून लिंक्डइन लाईट हे व्हर्जनही भारतात सुरू करण्यात येणार असून, प्रोजेक्ट संगम हा उपक्रमही राबवण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस प्रगतिपथावर जात असून, स्टेट बँक ऑफ इंडियानंही क्लाऊड सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे.

तसेच बँकेच्या जवळपास 300हून अधिक ब्रँचेस क्लाऊड सुविधेशी जोडण्यात आल्या आहेत. सत्या नाडेलांनी ९९ डॉट्स या उपक्रमाचीही माहिती दिली असून, त्या माध्यमातून डॉक्टरांना क्षयरोग झालेल्या रुग्णांवर उपचार करणे सोपं जाणार आहे. तसेच भारताच्या दौ-यावर असलेल्या नाडेलांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही भेट घेतली आहे.

Web Title: Skype Light service in India will connect to 'Aadhae'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.