चालकाची झोप कळणार; जीव वाचणार, शास्त्रज्ञांकडून नवीन रक्त चाचणी विकसित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 08:49 AM2024-03-12T08:49:10+5:302024-03-12T08:49:20+5:30
या रक्त तपासणीमुळे भविष्यात रस्ते अपघात टाळता येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शास्त्रज्ञांनी एक नवीन रक्त चाचणी विकसित केली आहे, ज्यामध्ये बायोमार्करचा वापर करून वाहन चालकाची पुरेशी झोप झाली आहे की नाही हे शोधता येईल. या रक्त तपासणीमुळे भविष्यात रस्ते अपघात टाळता येतील.
ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठ आणि ब्रिटनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितले की, झोपेच्या कमतरतेमुळे गंभीर अपघात होऊन दुखापत किंवा मृत्यूचा धोका वाढतो. ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की, चाचणीमध्ये वापरण्यात आलेल्या बायोमार्कर्सने अभ्यासात सहभागी २४ तासांपेक्षा जास्त काळ जागे होते की नाही याचा अचूक अंदाज लावला. भविष्यात, रस्त्यावर वाहन चालवताना लाळ किंवा श्वासोच्छवासाची अशी बायोमार्कर चाचणी करता येईल का, यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत.