दीपक आरोंदेकर याला अटक सुकूर मारहाण व वाहन मोडतोड प्रकरण
By admin | Published: February 20, 2016 12:07 AM2016-02-20T00:07:04+5:302016-02-20T00:07:04+5:30
पर्वरी : सुकूर येथील बेनेदित नाझारेथ यांना मारहाण करून त्यांच्या कारची मोडतोड करणारा संशयित आरोपी दीपक आरोंदेकर (सुकूर) आणि त्याचा साथीदार भालचंद्र (मयूर) प्रभुदेसाई (म्हापसा) यांना पर्वरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर (क्र. जीए-०३, एन-५२७०) इनोवा वाहनासोबत ताब्यात घेतले. मारहाणीची ही घटना दि. १७ रोजी रात्री घडली होती.
Next
प ्वरी : सुकूर येथील बेनेदित नाझारेथ यांना मारहाण करून त्यांच्या कारची मोडतोड करणारा संशयित आरोपी दीपक आरोंदेकर (सुकूर) आणि त्याचा साथीदार भालचंद्र (मयूर) प्रभुदेसाई (म्हापसा) यांना पर्वरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर (क्र. जीए-०३, एन-५२७०) इनोवा वाहनासोबत ताब्यात घेतले. मारहाणीची ही घटना दि. १७ रोजी रात्री घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक आरोंदेकर ही गुन्हेगार प्रवृत्तीची व्यक्ती असून त्याच्यावर यापूर्वी म्हापसा आणि साळगाव पोलीस स्थानकात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तीन वेळा त्याला सुरक्षा राखण्याच्या निमित्ताने अटक केली होती. तसेच त्याच्यावर दोन अजामीनपात्र गुन्हे दाखल असून खटले न्यायप्रविष्ट आहेत. दीपक याने आमदार रोहन खंवटे यांचा माणूस असल्याचे सांगून नाझारेथ यांना अर्वाच्य शिवीगाळ आणि मारहाण करून त्यांच्या वाहनाची मोडतोड केली होती. या प्रकरणामुळे पर्वरी मतदारसंघात राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विरोधकांनी आमदार खंवटे यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न केला होता.याप्रकरणी खंवटे यांनी पर्वरी पोलीस स्थानकात जाऊन निषेध व्यक्त करून मारहाण करणार्या आरोपीला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साज्जीत पिल्ले आणि राघोबा कामत यांना याकामी लावले होते. त्यांनी शिताफीने महामार्गावर दोघा संशयितांना शुक्रवारी दुपारी ३ वा. इनोवा वाहनासोबत ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)