जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर झोपला; काही सेकंदात ट्रेन आली अन्...पाहा धक्कादायक Video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 08:33 PM2023-06-11T20:33:52+5:302023-06-11T20:35:19+5:30
Rail track suicide rescue video: पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे.
कोलकाता- पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्टेशनवर एक मोठी दुर्घटना टळली. एक व्यक्ती ट्रेनखाली आत्महत्या करण्यासाठी आला, त्याने रुळावर आपले डोके ठेवले. यावेळी क्षणाचाही विलंब न करता स्टेशनवर कर्तव्य बजावणाऱ्या महिला आरपीएफ कॉन्स्टेबलने त्या व्यक्तीकडे धाव घेतली आणि त्याला बाजुला सारले.
या घटनेचा एक व्हिडिओ आरपीएफ इंडियाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती ट्रेन येण्याच्या काही काही सेकंदापूर्वी रुळावर डोके ठेवून झोपल्याचे दिसेत आहे. यावेळी लेडी कॉन्स्टेबल के. सुमतीने माणूस रुळावर झोपल्याचे पाहून तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला रुळावरुन बाजुला सारले.
#RPF Lady Constable K Sumathi fearlessly pulled a person off the track, moments before a speeding train passes by at Purwa Medinipur railway station.
— RPF INDIA (@RPF_INDIA) June 8, 2023
Kudus to her commitment towards #passengersafety.#MissionJeevanRaksha#FearlessProtectorpic.twitter.com/yEdrEb48Tg
महिला कॉन्स्टेबल त्या व्यक्तीचा जीव वाचवताना दोन लोक सुमतीच्या मदतीसाठी खाली येतात. ही घटना पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकजण महिला कॉन्स्टेबलचे कौतुक करत आहेत.