नवीन बसस्थानकाला सरकते प्रवेशद्वार
By admin | Published: April 22, 2016 11:21 PM2016-04-22T23:21:43+5:302016-04-22T23:21:43+5:30
जळगाव- अनधिकृत वाहनांचा होणारा वारंवार प्रवेश व इतर समस्या लक्षात घेता नवीन बसस्थानकाच्या बस आत व बाहेर जाणार्या दोन्ही दरवाजांना सरकते प्रवेशद्वार बसविण्याची कार्यवाही सुरू आहे.
Next
ज गाव- अनधिकृत वाहनांचा होणारा वारंवार प्रवेश व इतर समस्या लक्षात घेता नवीन बसस्थानकाच्या बस आत व बाहेर जाणार्या दोन्ही दरवाजांना सरकते प्रवेशद्वार बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. हे सरकते प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू झाले असून, आठ दिवसात द्वार उभारले जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक आर.वाय.साळवे यांनी दिली. अनधिकृत प्रवेश टाळणारअनेकदा बसस्थानकात मोर्चे आणून प्रवाशांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेस बसस्थानकात संशयित व्यक्ती फिरते, पण त्यांना बसस्थानकात शोधण्याची मोहीम सुरू होण्यापूर्वीच प्रवेशद्वार नसल्याने अशा व्यक्ती पसार होतात. तसेच मध्यरात्री अनेक अनधिकृत वाहने बसस्थानकामध्ये असतात. अशी वाहने येऊ नये व इतर खबरदारीचे उपाय म्हणून सरकते प्रवेशद्वार बसविले जात आहेत. असेच द्वार बसस्थानकामध्ये डिझेलपंप असलेल्या भागातही लावले जाणार आहे. आठ दिवसात कामया सरकत्या प्रवेशद्वारांचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना कार्यालयाने दिल्या आहेत. रात्रीच्या वेळेस हे काम गतीने सुरू असते. अडीच लाख निधीया कामासाठी जळगाव एसटी विभागाने अडीच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रवेशद्वारांसाठी स्वतंत्र निविदा काढून काम देण्यात आले. तीन रक्षक नियुक्तबसस्थानकात रात्रीच्या वेळेस कुणी अनधिकृत प्रवेश करू नये यासाठी तीन रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. दोन रक्षक हे दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारांनजीक असतात. तर तिसरा रक्षक हा बसस्थानकामध्ये असतो. सहा सीसीटीव्हींची मागणीबसस्थानकात नव्याने बसविले जाणारे प्रवेशद्वार आणि निवारामध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे तशी मागणी केली आहे. प्रवेशद्वारांवर चार आणि निवार्यामध्ये दोन सीसीटीव्ही बसविले जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक साळवे यांनी दिली.