अचानक प्रकाशामुळे विमानाला हिसका

By admin | Published: November 16, 2016 01:15 AM2016-11-16T01:15:07+5:302016-11-16T01:15:07+5:30

खासगी विमान आता उतरणार इतक्यात अज्ञात व्यक्तीने प्रकाश चमकवल्यामुळे तळावर विमान उतरण्याआधी त्याला काही क्षण हिसका बसला.

Slip the plane due to the sudden light | अचानक प्रकाशामुळे विमानाला हिसका

अचानक प्रकाशामुळे विमानाला हिसका

Next

चेन्नई : खासगी विमान आता उतरणार इतक्यात अज्ञात व्यक्तीने प्रकाश चमकवल्यामुळे तळावर विमान उतरण्याआधी त्याला काही क्षण हिसका बसला. सोमवारी रात्री अचानक पायलटच्या केबिनमध्ये प्रकाश चमकला. विमानाला बसलेल्या हिसक्यामुळे कोणीही प्रवासी जखमी झाला नाही. जेट एअरवेजच्या या विमानात १४८ प्रवासी होते. पायलटच्या जवळ बसलेले पल्लवारम यांनी हा प्रकाश चमकवला. पायलटने विमानतळ अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीनुसार पल्लवारम यांच्यावर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला असून चौकशीही सुरू झाली आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी या प्रकरणात विमानतळ अधिकाऱ्यांनीही लक्ष घातले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Slip the plane due to the sudden light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.