उघड्यावर लघुशंका; केंद्रीय मंत्र्यावर टीका

By admin | Published: June 30, 2017 12:35 AM2017-06-30T00:35:36+5:302017-06-30T00:35:36+5:30

सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यात केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग उघड्यावर लघुशंका करत असतानाचे एक छायाचित्र समाजमाध्यमांत

Small children on the open; Union minister criticism | उघड्यावर लघुशंका; केंद्रीय मंत्र्यावर टीका

उघड्यावर लघुशंका; केंद्रीय मंत्र्यावर टीका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यात केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग उघड्यावर लघुशंका करत असतानाचे एक छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी मंत्री महोदयांवर टीकेची झोड उठविली व पंतप्रधान मोदींच्या लाडक्या स्वच्छ भारत मिशनचीही टर उडविली. पण त्यामुळे भारतात रस्त्यांवर स्वच्छतागृहे नसल्याने लोकांची कशी अडचण होते, हेही स्पष्ट झाले. महिलांचे तसेच वृद्ध व मधुमेह असलेल्यांचे तर स्वच्छतागृहे नसल्याने प्रवासात नेहमीच हाल होत असतात.
राधा मोहन सिंग यांचे छायाचित्र दिवसभर टिष्ट्वटरवर फिरले आणि ते चर्चा, टीका व उपाहासाचा विषय ठरले. आपल्याविषयीचा हा बोलबाला स्वत: राधा मोहन सिंग यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी छायाचित्रात दिसणाऱ्या आपल्या कृतीचे समर्थन केले. ते छायाचित्र राष्ट्रीय महामार्ग क्र. २८वरील पिपारा येथील एका धाब्याच्या परिसरातील असल्याचा खुलासा त्यांनी केला. छायाचित्रात दिसणारे ते ठिकाण मंत्र्यांच्या चंपारण्य मतदारसंघातील आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना बऱ्याच दूरपर्यंत नैसर्गिक विधी उरकण्याची कुठे सोय नव्हती म्हणून गाडी थांबवून आपल्याला त्या ठिकाणी लघुशंका उरकावी लागली. पण हे करताना आपला हेतू वाईट नव्हता, अशी मल्लिनाथी कृषिमंत्र्यांनी केली. बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाने आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलवर हा फोटो प्रसिद्ध केला व सोबत असे उपरोधिक भाष्यही टाकले: राज्याच्या दुष्काळग्रस्त भागात सिंचन योजनेचे उद््घाटन करून केंद्रीय कृषिमंत्र्यांनी स्वच्छ भारत अभियानालाही दिली बळकटी!
बिहार प्रदेश भाजपाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनीही मंत्र्यांची पाठराखण करताना म्हटले की, मंत्रीसाहेबांनी काहीच चुकीचे केले नाही. दूरवरचा प्रवास करताना वाटेत कुठे सोय नसेल तर माणूस नैसर्गिक विधी किती वेळ रोखून ठेवणार?

Web Title: Small children on the open; Union minister criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.