भारतातील लहान शेतकरी संपतील !
By Admin | Published: November 27, 2014 01:44 AM2014-11-27T01:44:25+5:302014-11-27T01:44:25+5:30
देशातील लहान शेतक:यांची स्थिती खूपच दयनीय आहे. पंजाबमध्ये महिला शेतकरीही आत्महत्या करत आहेत.
पणजी : देशातील लहान शेतक:यांची स्थिती खूपच दयनीय आहे. पंजाबमध्ये महिला शेतकरीही आत्महत्या करत आहेत. भविष्यात लहान शेतकरी संपूनच जातील, अशी खंत कविता बहल या महिला दिग्दर्शकाने व्यक्त केली.
पूर्वाश्रमीच्या पत्रकार असलेल्या बहल यांनी शेतकरी व महिला शेतक:यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत. त्यांनी पंजाबमधील दोघा विधवा महिलांवर चित्रपट काढला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडल्याने या विधवा आत्महत्या करतात,
याचे चित्रण त्यांनी केले आहे. 45
व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘कँडल्स
ऑफ वींड’ हा त्यांचा
चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
माझा चित्रपट दूरदर्शन व अन्य वाहिन्यांनीही स्वीकारला नव्हता पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पंजाबमधील पुरुष शेतकरी कर्ज घेतात मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला प्रचंड मोठय़ा कर्जाला सामोरे जावे लागते. थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतक:यांची पिळवणूक आणखी वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सहा महिन्यांचा मुलगा सांभाळून मी चित्रपट निर्मिती सुरू केली. मी व माङया पतीने नोकरी सोडून चित्रपट निर्मितीला वाहून घेतले, असे बलह यांनी सांगितले.
मोनालिसा दासगुप्ता या अमेरिकेत राहणा:या महिला सिने निर्मात्याही यावेळी उपस्थित होत्या. मी ग्रामीण भारतातील परंपरा, संस्कृती व स्थितीवर प्रकाश टाकणारा चित्रपट काढून तो विदेशात दाखवावा असे ठरविले व त्यानुसार नॉन फिचर
फिल्म काढल्याचे मोनालिसा
यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)