छाेटी बचत, माेठा फायदा; केंद्र सरकारकडून गुंतवणूकदारांना गिफ्ट, अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:59 AM2023-04-01T06:59:03+5:302023-04-01T06:59:12+5:30
सरत्या वर्षाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात केंद्र सरकारने टपाल खात्यात बचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना गिफ्ट दिले आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सोडून इतर सर्व योजनांच्या व्याजदरात ०.२० ते १.१० टक्क्यांची वाढ केली. नवीन दर हे जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी लागू असतील. सरत्या वर्षाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात केंद्र सरकारने टपाल खात्यात बचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना गिफ्ट दिले आहे.
पोस्ट कार्यालयाच्या अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. केंद्र सरकारने जानेवारी ते
मार्च २०२३ या दरम्यान व्याजदर वाढविले आहे.
असे आहेत व्याजदरातील बदल
योजना आधीचा दर नवा दर
बचत ठेव ४.० ४.०
१ वर्षाची ठेव ६.६ ६.८
२ वर्षांची ठेव ६.८ ६.९
३ वर्षांची ठेव ६.९ ७.०
५ वर्षांची ठेव ७.० ७.५
५ वर्षांची आवर्त ठेव ५.८ ६.२
ज्येष्ठांची बचत योजना ८.० ८.२
मासिक उत्पन्न योजना ७.१ ७.४
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ७.० ७.७
पीपीएफ ७.१ ७.१
किसान विकास पत्र ७.२ ७.५
(१२० महिने) (११५ महिने)
सुकन्या समृद्धी योजना ७.६ ८.०