मोदींचा मतदारसंघ बनणार स्मार्ट सिटी

By admin | Published: August 31, 2014 03:42 AM2014-08-31T03:42:54+5:302014-09-01T14:44:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसीला स्मार्ट सिटी करण्यासाठी जपानशी सामंजस्य करार केला आहे.

Smart City to become Modi's constituency | मोदींचा मतदारसंघ बनणार स्मार्ट सिटी

मोदींचा मतदारसंघ बनणार स्मार्ट सिटी

Next
क्योटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसीला स्मार्ट सिटी करण्यासाठी जपानशी सामंजस्य करार केला आहे. जपानमधील प्राचीन क्योटो शहराच्या धर्तीवर वाराणसीला विकसित करण्यासाठीच्या करारावर उभय देशांनी शनिवारी स्वाक्षरी केली. क्योटो हे प्राचीनत्व व आधुनिकता यांचा अनोखा संगम असलेले शहर म्हणून ओळखले जाते.
पंतप्रधान मोदी आणि त्यांचे जपानी समपदस्थ शिंझो अबे यांच्या उपस्थितीत येथील भारतीय राजदूत दीपा वाधवा आणि क्योटोचे महापौर दाईसाका कादोक्वा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
पंतप्रधान मोदी हे आज आपल्या पाचदिवसीय जपान दौ:यासाठी येथे 
दाखल झाले. तत्पूर्वी, जपानी पंतप्रधान 
अबे यांनी क्योटो विश्रमगृहावर त्यांचे स्वागत केले. 
वारसा स्थळांचे संवर्धन, शहराचे आधुनिकीकरण आणि कला, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रत उभय पक्षांद्वारे परस्पर सहकार्य केले जाईल. भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती 
दिली. या करारानुसार, दोन्ही देशांतील वारसा स्थळ म्हणून ओळखली जाणारी 
शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित केली जातील. (वृत्तसंस्था)\
च्क्योटो हे बौद्ध संस्कृतीचा वारसा असलेले जपानमधील स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाते. मोदी यांनी निवडणुकीदरम्यान देशभरात 1क्क् स्मार्ट सिटी उभारण्याचे आश्वासन दिले होते. 
च्या करारानुसार, समानता व परस्पर आदर ही समान मूल्य असलेल्या दोन्ही शहरांदरम्यान महत्त्वाच्या क्षेत्रत सहकार्य केले जाईल. अबे यांनी मोदी यांच्या स्वागताप्रीत्यर्थ आज संध्याकाळी क्योटो येथे भोजनाचे आयोजन केले होते. रविवारी संध्याकाळी पंतप्रधान टोकिओकडे रवाना होतील. उल्लेखनीय म्हणजे पंतप्रधान मोदी यांचा भारतीय उपखंडाबाहेरील हा पहिला विदेश दौरा आहे. 1 सप्टेंबर रोजी उभय देशांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

 

Web Title: Smart City to become Modi's constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.