पवारांनाही आले हसू... उदयनराजेंनी दिल्लीतील 6 जनपथवर जाऊन घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 01:20 PM2021-12-15T13:20:29+5:302021-12-15T13:21:01+5:30

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमही घेण्यात आला.

Smile to Sharad Pawar too ... Udayan Raje Bhosale visited 6 Janpath in dehi | पवारांनाही आले हसू... उदयनराजेंनी दिल्लीतील 6 जनपथवर जाऊन घेतली भेट

पवारांनाही आले हसू... उदयनराजेंनी दिल्लीतील 6 जनपथवर जाऊन घेतली भेट

Next
ठळक मुद्देशरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमही घेण्यात आला.

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि भाजपचे राज्यसभा खासदार शरद पवार यांची राजधानी दिल्लीत भेट झाली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासदार उदयनराजे यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सध्या हिवाळी सुरू अधिवेशन असल्याने सर्वच खासदार दिल्लीत आहेत. 

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमही घेण्यात आला. देशभरातून शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या गेल्या. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही त्यांना सदिच्छा दिल्या. त्यामुळे, उदयनराजेंनीही त्याच पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त शरद पवार याची सदिच्छा भेट घेतल्याचे समजते. 


उदयनराजे यांनी स्वत: ट्विट करुन या भेटीचा फोटो शेअर केला आहे. तसेच, शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. त्यामुळे, पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही भाजपने त्यांना राज्यसभा खासदार म्हणून दिल्लीत काम करण्याची संधी दिली आहे.

Web Title: Smile to Sharad Pawar too ... Udayan Raje Bhosale visited 6 Janpath in dehi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.