भुकंपातून बचावल्या स्मिता वाघ थरारक अनुभव: मिझोराम, आसाम, नागालॅँड व मेघालयाच्या दौरा
By admin | Published: January 5, 2016 12:28 AM2016-01-05T00:28:06+5:302016-01-05T00:28:06+5:30
जळगाव : राज्याच्या विधीमंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती उत्तर पूर्व मधील मिझोराम, आसाम, नागालॅँड व मेघालयाच्या दौर्यावर आहे. ही समिती नागालॅँडमधील कोहिमा येथे असताना भूकंप झाला. सुदैवाने भुकंपातून बचावलो अशी प्रतिक्रिया समितीच्या सदस्य आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली.
Next
ज गाव : राज्याच्या विधीमंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती उत्तर पूर्व मधील मिझोराम, आसाम, नागालॅँड व मेघालयाच्या दौर्यावर आहे. ही समिती नागालॅँडमधील कोहिमा येथे असताना भूकंप झाला. सुदैवाने भुकंपातून बचावलो अशी प्रतिक्रिया समितीच्या सदस्य आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली. राज्याची इतर मागासवर्ग कल्याण समिती उत्तर-पूर्व राज्यांच्या दौर्यावर आहे. २९ डिसेंबरपासून या दौर्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मिझोराम विधानसभेत तेथील सदस्यांसमवेत समितीच्या सदस्यांची बैठक झाली. यानंतर ही समिती गुवाहाटी, काजीरंगा, माझुली, शिवासागर येथून ३ रोजी नागालॅँडमधील कोहिमा येथे आले होते. सोमवारी विविध बैठकांना ही समिती हजेरी लावणार होती. जिवाचा थरकाप उडाला४ रोजी पहाटे ४.३५ वाजेच्या दरम्यान समितीतील सदस्य कोहिमा येथील एका हॉटेलमध्ये असताना अचानक जोरजोराने आवाज येऊ लागला. त्या पाठोपाठ आरडाओरड सुरू झाला. सर्वजण आपापल्या रूममधून बाहेर पडले. बाहेर आल्यावर भुकंपाची माहिती मिळाली. या भागात बरीच पडझड झाली आहे. मात्र आम्ही सर्व सदस्य आता सुखरूप असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या बरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, समितीतील सदस्य आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार दीप्ती चौधरी, आमदार ग्यानराज चौगुले, डेप्युटी सेक्रेटरी नागनाथ थिटे होते. मात्र सर्वच सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. -----कोटया भागात फार मोठी हानी झाली. आता आम्ही आसाममधील काझीरंगा कडे आहोत. परमेश्वर व सर्वांच्या आशीर्वादाने बचावलो. - आमदार स्मिता वाघ