स्पाईसजेट विमानात धूर, प्रवाशांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 09:40 PM2018-04-11T21:40:37+5:302018-04-11T21:40:37+5:30
स्पाईसजेट कंपनीच्या विमानात धूर निघाल्याचे वृत्त आहे. याबाबत असे सांगण्यात येत आहे की, स्पाईसजेटचे विमान कोईम्बतूरहून बंगळुरुला जात होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांच्या आसनाजवळ धूर आल्याचे दिसून आले. यावेळी प्रवाशांची धावपळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरले.
बंगळुरु : स्पाईसजेट कंपनीच्या विमानात धूर निघाल्याचे वृत्त आहे. याबाबत असे सांगण्यात येत आहे की, स्पाईसजेटचे विमान कोईम्बतूरहून बंगळुरुला जात होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांच्या आसनाजवळ धूर आल्याचे दिसून आले. यावेळी प्रवाशांची धावपळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरले.
ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. स्पाईसजेटचे विमान-3466 कोईम्बतूरहून बंगळुरुला जात असताना ही घटना घडली. यावेळी विमानात धूर आल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. मात्र, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर विमान व्यवस्थित विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र, विमानात धूर कोठून आला किंवा काही तांत्रिक बिघाड झाला काय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळून शकली नाही.
दरम्यान, या घटनेप्रकरणी स्पाईसजेट कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरुप असल्याची माहिती सुद्धा यावेळी कंपनीने दिली.
Upon landing in Bengaluru, the crew of Coimbatore-Bengaluru Spicejet flight observed light smoke in front cabin. The aircraft made a normal landing and vacated the runway. Neither did the pilots seek nor was there any requirement of an emergency landing: Spicejet statement pic.twitter.com/7BKLwZKuU0
— ANI (@ANI) April 11, 2018