स्मृती इराणी अपघातग्रस्तांना मदत न करताच निघून गेल्याचा आरोप
By admin | Published: March 7, 2016 01:31 PM2016-03-07T13:31:08+5:302016-03-07T13:31:57+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत न केल्यानेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरच्या मुलीने केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ७ - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत न केल्यानेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरच्या मुलीने केला आहे. स्मृती इराणी यांच्या गाडीचा काल अपघात झाला होता ज्यामध्ये नोएडामधील डॉ नागर यांचा मृत्यू झाला होता.
स्मृती इराणी यांनी अपघात झाल्यानंतर जखमीला मदत केल्याची माहिती ट्विटरवरुन टाकली होती. मात्र डॉ नागर यांची मुलगी संदिलीने अपघातानंतर स्मृती इराणी मदत न करताच गाडीतून निघून गेल्याचा आरोप केला आहे. कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचं तिच म्हणणं आहे. अपघात झाला तेव्हा संदिलीदेखील आपल्या चुलत भावासोबत लग्नासाठी चालली होती. अपघातात ते दोघेेदेखील जखमी झाले होते.
Tried to help the injured who were lying on the road for quiet sometime and ensured they reach a hospital. Pray for their safety.
— Smriti Z Irani (@smritiirani) March 5, 2016
आम्ही स्मृती इराणींकडे मदत मागितली मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. मी आणि माझा चुलत भाऊ रस्त्यावर मदतीची प्रतिक्षा करत उभे होतो. स्मृती इराणींच्या गाडीने आमच्या दुचाकीला ठोकर दिली. आमची दुचाकी खाली पडल्यावर आम्ही मदत मागितली. मात्र त्यांनी नकार दिला, त्यांनी सांगितल तुम्हा नंतर मदत मिळेल. जर त्यांनी मदत केली असती तर आज माझे वडील जिवंत असते असं संदिलीने सांगितलं आहे.
Agra: Smriti Irani's convoy rammed into our car,she came out,I begged her for help but she left-Daughter of victim pic.twitter.com/d04zWUvuIO
— ANI (@ANI_news) March 7, 2016