स्मृती इराणी राष्ट्रपती होणार - ज्योतिषी नथ्थूलाल यांचे भाकीत

By Admin | Published: November 24, 2014 01:34 PM2014-11-24T13:34:41+5:302014-11-24T15:40:45+5:30

तरुणांचे भविष्य ज्यांच्या हातात आहे, त्या स्मृती ईराणी आपला हात ज्योतिषाला दाखवत असल्यामुळे वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत.

Smriti Irani to be President - Jyotishi Nathhulal's prediction | स्मृती इराणी राष्ट्रपती होणार - ज्योतिषी नथ्थूलाल यांचे भाकीत

स्मृती इराणी राष्ट्रपती होणार - ज्योतिषी नथ्थूलाल यांचे भाकीत

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

भिलवाडा, दि. २४ - मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांचे भविष्य उज्ज्वल असून त्या भारताच्या राष्ट्रपती होतील असे भाकीत राजस्थानमधील ज्योतिषी नथ्थूलाल यांनी वर्तवले आहे. स्मृती इराणी यांनी तब्बल चार तास नथ्थूलाल यांच्याशी स्वत:च्या भविष्यासंदर्भात चर्चा केल्याने इराणी पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकल्या आहेत. 
खासगी दौ-यानिमित्त राजस्थानमध्ये गेलेल्या स्मृती इराणी यांनी रविवारी भिलवाडा येथे ज्योतिषी नथ्थूलाल व्यास यांच्या घरी भेट दिली. या दरम्यान इराणींनी नथ्थूलाल यांच्याकडून स्वतःच्या राजकीय कारकिर्द आणि कुटुंबाच्या स्वास्थ्याविषयी भविष्य जाणून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 'तुम्ही एक दिवस भारताच्या राष्ट्रपती होणार' असे नथ्थूलाल यांनी स्मृती इराणींना सांगितले आहे. अत्यंत महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असलेल्या इराणींनी ज्योतिषीकडे जाऊन अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याची टीका विरोधकांनी सुरु केली आहे.  तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'ही इराणींची खासगी बाब असून ज्योतिषी हे एक शास्त्र असून त्यावर ऐवढा गदारोळ निर्माण करणे योग्य नाही' असे सांगत स्मृती इराणींची पाठराखणच केली.
इराणींनी नथ्थूलाल यांच्याकडून भविष्य जाणून घेतल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही इराणी नथ्थूलाल यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी नथ्थूलाल यांनी इराणी यांना आगामी वर्षात महत्त्वाचे राजकीय पद मिळेल असे सांगितले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचाही नथ्थूलाल यांच्यावर विश्वास होता व त्यादेखील नथ्थूलाल यांच्याकडून भविष्य जाणून घेत अशी माहिती समोर येत आहे.
ज्योतिषाकडे जायचं की नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असला तरी मनुष्यबळ विकासासारख्या महत्त्वाच्या खात्याच्या मंत्रीपदी असलेल्या खासदाराने आपलं भविष्य जाणण्यासाठी ज्योतिषाचा सहारा घेणं अनेकांना रुचलेलं नसल्याचं दिसत आहे.
----------------
प्रसारमाध्यांना टीआरपी दिल्याचा आनंद
ज्योतिषीची भेट घेतल्याने निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना स्मृती इराणींनी प्रसारमाध्यमांवरच आगपाखड केली. मी टीआरपीमध्ये योगदान देऊ शकते हे मला आज समजले, तुम्हाला मदत केल्याचा मला आनंद आहे अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Web Title: Smriti Irani to be President - Jyotishi Nathhulal's prediction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.