Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 07:30 PM2023-02-06T19:30:49+5:302023-02-06T19:31:30+5:30

Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शेनेल इराणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Smriti Irani Daughter Wedding: Union Minister Smriti Irani's daughter's wedding will be a royal ceremony in Nagaur fort | Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..

Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..

googlenewsNext


Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची मुलगी शेनेल इराणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमधील खिनवसार किल्ला (नागौर) येथे शेनेल इराणीच्या लग्नाचे कार्यक्रम होतील. मिळालेल्या माहितीनुसार, शेनेल अर्जुन भल्लासोबत लग्न करणार आहे.

या पूर्वीच स्मृती इराणी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन मुलगी शेनेल आणि भावी जावई अर्जुन भल्ला यांची छायाचित्रे शेअर करुन गोड बातमी दिली होती. त्यांनी लिहिले होते की, 'अर्जुन भल्ला आता आमच्या हृदयात राहतो. आमच्या कुटुंबात स्वागत आहे.' गंमतीत स्मृती इराणी यांनी पुढे लिहिले की, 'तुमचा एका वेड्या सासऱ्याशी आणि त्याहूनही वाईट सासूशी सामना होणार आहे. गॉड ब्लेस...'

शेनल इराणी व्यवसायाने वकील आहेत
स्मृती इराणी यांच्या कन्या शेनेल इराणी व्यवसायाने एक वकील आहेत. तिचे शालेय शिक्षण मुंबईतूनच झाले आहे. शेनेल उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली आणि जॉर्जटाउन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. शेनेल इराणी ही झुबिन आणि त्यांची पहिली पत्नी मोना इराणी यांची मुलगी आहे. त्याचबरोबर स्मृती आणि झुबिन इराणी यांना मुलगा जोर आणि मुलगी जोश ही दोन मुले आहेत.

Web Title: Smriti Irani Daughter Wedding: Union Minister Smriti Irani's daughter's wedding will be a royal ceremony in Nagaur fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.