नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:54 PM2022-07-06T21:54:42+5:302022-07-06T21:55:16+5:30

आरसीपी सिंह हे भाजपात जाण्याची शक्यता आहे, तर नक्वींना भाजपामध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Smriti Irani, Jyotiraditya Scindia get additional charges of Minority Affairs, Ministry of Steel after Mukhtar Abbas Naqvi and Ram Chandra Prasad Singh resigned | नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली

नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली

googlenewsNext

राज्यसभेच्या सदस्यत्वाचा उद्या कार्यकाळ संपत असल्याने मुख्तार अब्बास नक्वी आणि आर सी पी सिंह यांनी आज राजीनामा दिला. यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्याकडील मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनीज्योतिरादित्य शिंदे आणि स्मृती इराणी यांच्याकडे सोपविला आहे. 

स्मृती इराणी यांच्याकडे आता आधीच्या महिला व बाल विकास मंत्रालयाबरोबरच अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. याशिवाय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पोलाद मंत्रालय असणार आहे. 

आरसीपी सिंह हे भाजपात जाण्याची शक्यता आहे, तर नक्वींना भाजपामध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना निरोप देताना सांगितले की, या दोघांनी मंत्री असताना देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. मुख्तार अब्बास नकवी हे राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यावेळी भाजपाने नकवी यांना राज्यसभेवर पाठवले नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो, असे मानले जात आहे. याशिवाय, उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मुख्तार अब्बास नकवी हे भाजपाचे उमेदवार असू शकतात अशीही चर्चा आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात नकवी ८ वर्षांपासून कार्यरत
मुख्तार अब्बास नकवी हे 2010 ते 2016 पर्यंत यूपीचे राज्यसभा सदस्य होते. 2016 मध्ये त्यांना झारखंडमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. नकवी यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर, 26 मे 2014 पासून ते मोदी सरकारमध्ये अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री बनले. 12 जुलै 2016 रोजी नजमा हेपतुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळाला. त्यानंतर 30 मे 2019 रोजी मोदी मंत्रिमंडळात पुन्हा सामील झाले आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीपद भूषवले.

Web Title: Smriti Irani, Jyotiraditya Scindia get additional charges of Minority Affairs, Ministry of Steel after Mukhtar Abbas Naqvi and Ram Chandra Prasad Singh resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.