स्मृती इराणी टॉमेटो दरवाढीच्या प्रश्नावर भडकल्या; अँकरला तुरुंगाची आठवण केली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 09:20 AM2023-08-20T09:20:29+5:302023-08-20T09:21:26+5:30
गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतींवर आक्रमक आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी आता महागाईवर शांत आहेत. इराणी या मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.
काँग्रेस सरकारच्या काळात गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतींवर आक्रमक आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी आता महागाईवर शांत आहेत. इराणी या मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. आता गॅसच नाही तर टॉमेटोच्या किंमतीदेखील काहीचे काही वाढल्या आहेत. यावर प्रश्न विचारताच स्मृती इराणी लाईव्ह शोमध्ये अँकरवर भडकल्या होत्या. तसेच या अँकरला त्याच्या तुरुंगवारीची आठवणही त्यांनी करून दिली आहे.
या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्मृती इराणी एका टीव्ही कार्यक्रमात मुलाखतीसाठी गेल्या होत्या. यावेळी या न्यूज चॅनलच्या अँकरने टॉमेटोचे दर २५०-३०० रुपये किलोवर गेले आहेत, तुमच्या घरात यावर चर्चा होते का, असा सवाल विचारला. तेव्हा स्मृती इराणी यांचे वागणे एकदम बदलले. त्यांनी तुम्ही गोष्टींना महत्वहीन करण्याचा प्रयत्न करत आहात असा आरोप केला. तसेच मी देखील तुम्हाला विचारू शकते की तुम्ही तुरुंगात असताना काय झालेले, असा सवाल केला.
ज़िम्मेदारी और जवाबदेही ये दोनों शब्द मोदी सरकार की डिक्शनरी में है ही नहीं।#Smritiirani#टमाटर#सुधीर_चौधरी#तिहाड़_जेलpic.twitter.com/XAYQNxIE0J
— Netta D'Souza (@dnetta) August 19, 2023
या व्हिडिओमुळे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर ट्रेंड करू लागल्या आहेत. लोक म्हणाले की जबाबदारी आणि उत्तरदायित्व मोदी सरकारच्या शब्दकोशात नाही. @Ajaykum55123310 या युजरने लिहिले की, यात तुरुंगाची चर्चा कुठून आली, प्रश्नाचे उत्तर द्या, टोमॅटो 200-250 रुपये झाले पण भाजप अजूनही आपल्या प्रश्नांपासून पळत आहे? आणखी एका युजर @shafqatali09 ने लिहिले की, ती फक्त टोमॅटोची किंमत विचारल्यावर रागावली, विचार करा, सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींबाबत आधीच्या आंदोलनाची आठवण झाली असती तर काय झाले असते.