स्मृती इराणींना धक्का, जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास खाते!

By admin | Published: July 6, 2016 10:45 AM2016-07-06T10:45:33+5:302016-07-06T10:54:38+5:30

स्मृती इराणींकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आले असून हे खाते प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवण्यात आले.

Smriti Irani shocks, Javadekar manpower development account! | स्मृती इराणींना धक्का, जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास खाते!

स्मृती इराणींना धक्का, जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास खाते!

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील फेरबदल व दुसरा विस्तार मंगळवारी पार पडला असून नवीन १९ मंत्र्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले तर ५ मंत्र्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र या मंत्रीमंडळ विस्ताराचा सगळ्यात मोठा धक्का स्मृती इराणींना बसला असून त्यांच्याकडून मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा भार काढून हे खाते प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 
स्वतंत्र प्रभार असलेले वन व पर्यावरण मंत्रालयाचा कारभार सांभाळणा-या प्रकाश जावडेकरांना क२बिनेटपदी बढती देऊन त्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला. तर स्मृती इराणी यांना तुलनेने कमी महत्वाचे असे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मंत्र्यांची झाडाझडती घेत काम दाखवा अन्यथा बदलांना वा कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा दिला होता. इराणींच्या बदलीने हा इशारा प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे. 
 
दरम्यान स्मृती इराणींना हटवण्याच्या निर्णयावर ट्विटकरांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Web Title: Smriti Irani shocks, Javadekar manpower development account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.