स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीयाची हत्या, उत्तर प्रदेशात हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:06 AM2019-05-27T04:06:12+5:302019-05-27T04:06:28+5:30
अमेठी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असलेले माजी सरपंच सुरेंद्र सिंह (५०) यांना दोन मारेकऱ्यांनी गोळ््या झाडून हत्या केली.
अमेठी : अमेठी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असलेले माजी सरपंच सुरेंद्र सिंह (५०) यांना दोन मारेकऱ्यांनी गोळ््या झाडून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर उत्तर प्रदेशात घडलेली ही पहिली हिंसक घटना आहे. बरौलिया गावाचे माजी सरपंच असलेले सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री साडेअकरा वाजता हत्या करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दयाराम यांनी सांगितले की, गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनौ येथील रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जात असताना वाटेतच ते मरण पावले. स्मृति इराणी यांचा विजय होण्यासाठी त्यांनी प्रचारकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
>पार्थिवाला स्मृती इराणींनी दिला खांदा
सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी रविवारी त्यांच्या पार्थिवाला स्मृति इराणी यांनी खांदा दिला. आपल्या मिळालेल्या विजयात सुरेंद्र सिंह यांचा मोलाचा वाटा आहे अशीही प्रतिक्रिया स्मृति इराणी यांनी व्यक्त केली.