एसएमटीचा संप मागे 15 सप्टेंबरला चर्चा: आडम मास्तरांची दिलगिरी

By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:13+5:302015-09-04T22:45:13+5:30

सोलापूर :

SMT's talks conclude on September 15: Adam Maser's apology | एसएमटीचा संप मागे 15 सप्टेंबरला चर्चा: आडम मास्तरांची दिलगिरी

एसएमटीचा संप मागे 15 सप्टेंबरला चर्चा: आडम मास्तरांची दिलगिरी

Next
लापूर :
विविध मागण्यांसाठी एसएमटीच्या (महापालिका परिवहन उपक्रम) कर्मचार्‍यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेला बेमुदत संप मागे घेतला. लाल बावटा कामगार युनियनचे नेते, माजी आमदार आडम मास्तर यांनी संप मागे घेण्याची घोषणा करतानाच प्रवाशांना झालेल्या गैरसोयींबाबत दिलगिरी व्यक्त केली.
परिवहन खात्यातील लाल बावटा कामगार युनियनने 1 एप्रिल 2011 पासून सहावा वेतन आयोग लागू करा व फरकाची रक्कम दिवाळीपर्यंत द्या, कंत्राटी कर्मचार्‍यांना 13 हजार मानधान द्यावे व निवृत्त कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकासह रक्कम द्यावी आदी मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला होता. संप यशस्वी करण्यासाठी आंदोलकांनी नवीन बसची चाके काढून प्रवेशद्वारावर उभी केली होती. निदर्शने करताना भाषणबाजीत प्रशासनावर चिखलफेक केली. यामुळे आयुक्त विजयकुमार काळम?पाटील संतप्त झाले होते. सोलापूर शहर स्मार्ट सिटी योजनेच्या यादीत आल्यानंतर काही दिवसांतच परिवहन कर्मचार्‍यांनी असा संप केल्याने नागरिकांची नाराजी ओढवून घेतली. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या प्रवृत्तीबाबत सर्वच स्तरातून टीका सुरू झाली. आंदोलकांनी पालकमंत्री, जिल्हाधिकार्‍यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. सिटी बसच्या बंदमुळे शाळकरी मुले, ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसला व परिवहनचे 24 लाखांचे नुकसान झाले.
चंदनशिवे, जानराव यांची शिष्टाई
आयुक्त काळम?पाटील व आडम मास्तर, आंदोलनाचे नेतृत्व करणारे सिद्धप्पा कलशे?ी, व्यंकटेश कोंगारी यांच्यात शिष्टाई घडविण्यासाठी नगरसेवक आनंद चंदनशिवे व कामगार नेते अशोक जानराव यांनी मदत केली. शुक्रवारी दुपारी महापालिकेत उभयतांची बैठक झाली. त्यावेळी आयुक्तांनी कामगारांबाबत मला सहानुभूती आहे, पण मागण्यांसाठी आंदोलन करण्याची ही वेळ नसल्याचे ठणकावले. त्यावर आंदोलक नरमले. परिवहनचे उत्पन्न वाढले असल्याबाबत आडम मास्तर यांनी आकडेवारी दिली व जनता गाडी सुरू केल्यास उत्पन्न वाढेल असा प्रस्ताव दिला. 14 सप्टेंबरपर्यंत मी परदेश दौर्‍यावर जात आहे. 15 सप्टेंबर रोजी यावर बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. त्यावर आंदोलकांचे समाधान झाले. परिवहन कामगारांच्या मागण्या रास्त आहेत, पण आंदोलनाची ही वेळ नव्हती. सामंजस्यपणे ही चर्चा झाल्याने समाधान असल्याचे जानराव म्हणाले.
इन्फो..
एसएमटी कामगारांची आई
एसएमटी कामगारांची आई आहे. ही संस्था आपलीच आहे. आयुक्तांनी कामगारांना शब्द दिला आहे. कामगारांबद्दल सहानुभूती जपणारा असा आयुक्त माझ्या जीवनात पाहिला नाही. जाहीर सभेत बोललेल्या कटू शब्दाबद्दल व लोकांच्या गैरसोयींबद्दल मी सर्वांचीच माफी मागतो. सोलापूरचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. आम्ही सर्वांनी मेहनत घेऊन परिवहनही स्मार्ट करू, अशी प्रतिक्रिया आडम मास्तर यांनी बैठकीत व्यक्त केली.
कामगारांना न्याय देईन
मी परिवहन कामगारांच्या विरोधात नाही, मागण्यांसाठी ह? करण्याची ही वेळ नाही. सण, उत्सव तोंडावर आहेत. उत्पन्न व मूळ गरजांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कामगारच बळकट करू शकतात. नवीन गाड्या आहेत, उत्पन्न वाढवा व फायदा घ्या. विनाकारण लोकांचा रोष ओढवून घेऊ नका. परिवहनच्या संपाबाबत काय घडले ते जाऊ द्या, कामगारांना निश्चित न्याय देईन, असे आश्वासन आयुक्त काळम?पाटील यांनी दिले.

Web Title: SMT's talks conclude on September 15: Adam Maser's apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.