‘ही तर साप आणि विषाची युती’
By admin | Published: July 24, 2015 12:58 AM2015-07-24T00:58:07+5:302015-07-24T04:45:38+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना साप संबोधले आहे तर काही दिवसांपूर्वी लालूप्रसादांनी
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना साप संबोधले आहे तर काही दिवसांपूर्वी लालूप्रसादांनी युतीचे हलाहल पिण्याची तयारी दर्शविली होती. या दोघांची विधाने परस्परांना विष आणि साप संबोधणारी आहेत. ही युती कशी टिकणार ते केवळ देवालाच माहीत, असे विधान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केले. दरम्यान, काँग्रेसने धर्मनिरपेक्ष आघाडीच्या नेत्यांनी परस्परांच्या भावना दुखावणारी विधाने टाळावीत, असा सल्ला दिला आहे.
‘चंदनाला साप लपेटला तरी सुगंध जात नाही’ अशा आशयाचे टिष्ट्वट करीत नितीशकुमार यांनी बुधवारी धमाल उडवून दिली. त्यानंतर त्यांनी हे विधान भाजपला उद्देशून असल्याचा खुलासाही केला. लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्याला सहमती दर्शविताना केलेल्या विधानाचे स्मरण पासवान यांनी करवून देत या दोघांची चांगलीच फिरकी घेतली. त्यावेळी लालूप्रसाद यांनी विष पिण्याचीही माझी तयारी असल्याचे म्हटले होते.