काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरूच; धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:55 AM2020-01-16T03:55:53+5:302020-01-16T06:59:02+5:30
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड हिमकडे कोसळून आणि बर्फवृष्टीशी संबंधित दुर्घटनांत मरण पावलेल्यांची संख्या ९३ झाली आहे.
श्रीनगर : काश्मीर खोºयात सलग चौथ्या दिवशी बुधवारी बर्फवृष्टी झाल्यामुळे येथील सगळी हवाई वाहतूक रद्द केली गेली, असे अधिकाºयाने सांगितले.
पठारी भागात मध्यम बर्फवृष्टी झाली, तर खोरे, जम्मू आणि लडाखच्या उंचावरील भागात ती जास्त होती. येत्या काही दिवसांत संपूर्ण खोºयात कुठे-कुठे बर्फवृष्टी होईल, असे हवामान खात्याचे भाकीत आहे. बुधवारी झालेल्या बर्फवृष्टीने श्रीनगर विमानतळावर येणारी व तेथून जाणारी विमाने रद्द झाली आहेत. धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे एकही विमान उतरले नाही, असे अधिकारी म्हणाला. रविवारपासून विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. मंगळवारी काही विमानांचे उड्डाण झाले.
पाकिस्तानात बळींची संख्या ९३
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड हिमकडे कोसळून आणि बर्फवृष्टीशी संबंधित दुर्घटनांत मरण पावलेल्यांची संख्या ९३ झाली आहे. या घटनांचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी अधिकारी घटनास्थळी गेले आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोºयाला हिमकडे कोसळून सर्वात जास्त फटका बसला आहे. या भागात शेकडो घरे व इमारतींची हानी झाली असून, ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानात २१, तर पंजाबच्या सियालकोट जिल्ह्यात सात जण या नैसर्गिक संकटात जीव गमावून बसले.
पंजाब, हरयाणातही थंडीची लाट
चंदीगड : पंजाब व हरयाणाच्या बहुतेक भागांत बुधवारी थंडीची लाट पसरल्यामुळे काही भागांत किमान तापमान शून्याच्या जवळ पोहोचले. हरयाणात नारनौल २.५ अंश सेल्सिअस, हिसार २.६, सिरसा ३.८ आणि पंजाबमधील अमृतसर २.६, हलवारा २.५, गुरदासपूर ३, फरिदकोट ३.५ आणि भटिंडा ३.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाले होते. या दोन्ही राज्यांतील इतर ठिकाणचे किमान तापमान असे होते- करनाल-५, भिवानी ५.३, रोहटक ६.२, आदमपूर ५.१, लुधियाना- ६.६ आणि पटियाला ५.२, चंदीगड- ९.२, पठाणकोट- ७.९, अंबाला ७.२ अंश सेल्सिअस.