"...तर अमित शाह यांनी आपलं खरं वक्तव्य काय होतं हे सांगावं’’, प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 22:29 IST2024-12-19T22:28:23+5:302024-12-19T22:29:13+5:30
Prakash Ambedkar's challenge Amit Shah: अमित शाह आणि भाजपाकडून आपलं विधान काटछाट करून पसरवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी अमित शाह यांनी त्यांचं खरं वक्तव्य काय होतं हे सांगावं, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.

"...तर अमित शाह यांनी आपलं खरं वक्तव्य काय होतं हे सांगावं’’, प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान
अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान, राज्यसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे संसदेपासून रस्त्यांपर्यंत वाद सुरू आहे. एकीकडे काँग्रेसने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांनीही या विवादात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमित शाह आणि भाजपाकडून आपलं विधान काटछाट करून पसरवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी अमित शाह यांनी त्यांचं खरं वक्तव्य काय होतं हे सांगावं, असं आव्हान दिलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अमित शाह यांचं जे वक्तव्य सोशल मीडियावर प्रसारित झालेलं आहे. त्यामध्ये कुठेही काटछाट करून ते प्रसारित झाल्याचं दिसत नाही आहे. अमित शाह हे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर का म्हणत आहात, जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर ७ पिढ्या स्वर्गात जातील, असं थेटपणे सांगत आहेत. माझ्यामध्ये यात कुठेही काटछाट झाल्याचं दिसत नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर पुढे अमित शाह यांना आव्हान देताना म्हणाले की, अमित शाह सांगत आहेत की, त्यांचं विधान मोडतोड करून समोर आणलं जात आहे. तर मग अमित शाह यांचं खरं वक्तव्य काय आहे. ते त्यांनी समोर आणावं. म्हणजे लोकांना सोशल मीडियावरील वक्तव्य आणि आणि अमित शाह यांनी केलेलं वक्यव्य यांची लोकांना पडताळणी करता येईल. दोन्ही विधानांमध्ये काय फरक आहे, हे लोकांसमोर येईल, असेही अमित शाह म्हणाले.