म्हणून संतप्त माकडांनी केला रास्ता रोको!

By admin | Published: April 26, 2017 07:23 PM2017-04-26T19:23:29+5:302017-04-26T19:23:29+5:30

पण माकडांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केल्याचे सांगितल्यास तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.

So angry monkeys stop the way! | म्हणून संतप्त माकडांनी केला रास्ता रोको!

म्हणून संतप्त माकडांनी केला रास्ता रोको!

Next
>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 26 - आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांनी रास्तारोको केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. एखादा अपघात, दंगल यामुळे चिडलेल्या नागरिकांनी वाहतुकीस अडथळा आणल्याचेही तुमच्या पाहण्यात असेल. पण आपल्या कळपातील एका सदस्याचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे चक्क माकडांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केल्याचे  सांगितल्यास तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण अशा प्रकारची घटना उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यात  घडली आहे.
 
 येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोपीगंजनगरमध्ये हनुमानगढी नावाचे प्राचीन मंदिर आहे.  येथे भक्तांकडून देण्यात येणाऱ्या प्रसाद आणि खाण्यामुळे माकडांचा कळप स्थायिक झाला आहे. आज सकाळी येथून जात असलेल्या एका रिक्षाची धडक एका माकडाला लागली. या धडकेत त्या माकडाचा मृत्यू झाला. त्यामुळे माकडांचा संपूर्ण कळप भडकला. 
 
येथे राहणाऱ्या माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने हा संपूर्ण कळप रस्त्यावर आला. त्यांनी रस्ता अडवला. तसेच ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. तेथून जाणारे इतर प्राणीही या माकडांच्या संतापातून सुटले नाहीत. हळुहळू ही बातमी सर्वत्र पसरल्याने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही तेथे आले. त्यावेळी माकडांनी त्यांचाही पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी धावत पळत कसाबसा आपला जीव वाचवला. संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती कायम होती. तर आपल्या सहकाऱ्याच्या मृत्युमुळे माकडांनी व्यक्त केलेला संताप चर्चेचा विषय ठरला होता. 

Web Title: So angry monkeys stop the way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.