...म्हणून काश्मीरमध्ये वाढल्या बँक लुटण्याच्या घटना
By admin | Published: May 9, 2017 08:34 AM2017-05-09T08:34:14+5:302017-05-09T08:41:53+5:30
काश्मीर खो-यात अलीकडे बँक लुटीच्या घटना वाढल्या आहेत. खो-यातील युवा वर्ग मोठया प्रमाणावर दहशतवादाकडे वळला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 9 - काश्मीर खो-यात अलीकडे बँक लुटीच्या घटना वाढल्या आहेत. खो-यातील युवा वर्ग मोठया प्रमाणावर दहशतवादाकडे वळला असून, त्यांना देण्यासाठी पैसा आणि शस्त्र नसल्याने बँक लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर काश्मीर खो-यात बँकमध्ये दरोडा आणि चोरीच्या 13 घटना घडल्या असून, नऊ वेळा बँक लुटण्याचा प्रयत्न झाला आहे.
दहशतवाद्यांनी बहुतांशवेळा जम्मू-काश्मीर बँकेलाच लुटण्याचा प्रयत्न केला. या बँकेचे खो-यामध्ये विविध शाखांच्या माध्यमातून मोठे जाळे पसरले असल्याने दहशतवाद्यांनी या बँकेलाच टार्गेट केले. 21 नोव्हेंबर 2016 ते 3 मे 2017 या काळात जम्मू-काश्मीर बँक, एसबीआय, अँक्सिस आणि अन्य बँकांमधून आतापर्यंत 90.87 लाख रुपये लुटले आहेत.
स्थानिक तरुण मोठया प्रमाणावर दहशतवादी संघटनांमध्ये सक्रीय होत असल्याने लुटमार आणि शस्त्रास्त्र पळवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे गुप्तचरयंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले. 8 नोव्हेंबरपूर्वी काश्मीर खो-यात दहशतवाद्यांची संख्या कमी होती. काश्मीर खो-यातील हिंसाचारामध्ये आपला हात नसल्याने पाकिस्तानकडून सांगण्यात येत असले तरी, पैशांसाठी पाकिस्तान अशा प्रकारच्या लुटमारीला प्रोत्साहन देत आहे.
पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांसाठी पाठवण्यात येणा-या पैशातील सर्वाधिक हिस्सा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यावर आणि शस्त्रास्त्रांवर खर्च केला जातो. थेट या दहशतवाद्यांच्या हातात येणारी रोकड कमी आहे. पाकिस्तानातून होणा-या फंडिंगवर नियंत्रण मिळवल्यानेच स्थानिक दहशतवाद्यांच्या हाती पैसा पडत नसल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी केला आहे.