...म्हणून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी खाल्ले चाबकाचे फटके, पाहा VIDEO
By बाळकृष्ण परब | Published: November 15, 2020 04:49 PM2020-11-15T16:49:22+5:302020-11-15T16:51:11+5:30
Chhattisgarh Diwali News : देशभरात रविवारी गोवर्धन पूजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशातील सर्व भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.
रायपूर - देशभरात रविवारी गोवर्धन पूजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशातील सर्व भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. छत्तीसगडमध्ये या दिवशी मुख्यमंत्री जनतेच्या सुखसमाधानासाठी प्रत्येक वर्षी गोवर्धन पूजेच्या दिवशी चाबकाचे फटके मारून घेतात.
यावर्षीसुद्धा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गोवर्धन पूजेच्या मुहुर्तावर सर्वांच्या मंगलकामनेसेठी दुर्ग जिल्ह्यातील जजंगिरी, कुम्हारीमध्ये चाबका़चे फटके झेलण्याची परंपरा पार पा़डली. स्वत: मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वविटर हँडलवरून या प्रथेबाबत माहिती दिली.
हमेशा की तरह इस बार भी आज दुर्ग जिले के ग्राम जजंगिरी, कुम्हारी पहुंचकर सबकी मंगलकामना के लिए सांटा का प्रहार झेलने की परंपरा निभाई।
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) November 15, 2020
यह सुंदर परंपरा सबकी खुशहाली के लिए मनाई जाती है। pic.twitter.com/w2XldUGinG
आपल्या ट्वीटर हँडलवर भूपेश बघेल यांनी लिहिले की, सालाबादप्रमाणे यावेळीही आज दुर्ग जिल्ह्यातील जजंगिरी, कुम्हारी गावात जाऊन सर्वांच्या सुखसमाधानासाठी चाबकाचे फटके खाण्याची परंपार पार पाडली. ही सुंदर परंपरा सर्वांच्या सुखसमाधानासाठी साजरी केली जाते.मात्र यावर्षी या परंपरेमध्ये एक बदल दिसून आला. यापूर्वी गावाचे ज्येष्ठ भरोसा ठाकूर चाबकाच्या फटक्यांचा प्रहार करत असत. मात्र यावेळी त्यांच्या निधनामुळे ही परंपरा त्यांचे पुत्र वीरेंद्र ठाकूर यांनी पूर्ण केली.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अन्नकुट आणि गोवर्धन पूजा केली जाते. ही निसर्गाची पूजा आहे. ज्याची सुरुवात भगवान श्रीकृष्णाने केली होती. या दिवशी प्रकृतीचा आधाराच्या रूपात गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. आणि समाजाचा आधार म्हणून गाईची पूजा केली जाते.या पूजेची सुरुवात ब्रज भूमीमधून सुरू झाली होती. त्यानंतर हळूहळू ही पूजा संपूर्ण देशभरात प्रचलित झाली. यावेळी अन्नकूट आणि गोवर्धन पूजेचा सण हा १५ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.